Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

Mar 1, 2023

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रसंत सुधारकांच्या जैव-विचार नात्यांची वीण गुंफत रंगला आंबेडकरी शाहिरी जलसा

राष्ट्रसंत सुधारकांच्या जैव-विचार नात्यांची वीण गुंफत रंगला आंबेडकरी शाहिरी जलसा

विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने भीमनगर चिचोंडी बु...

read more
हातात पेट्रोल,खाली गॅसची टाकी महावितरणच्या डी पी वर बसत तरुण शेतकऱ्याचे अभिनव आंदोलन.

हातात पेट्रोल,खाली गॅसची टाकी महावितरणच्या डी पी वर बसत तरुण शेतकऱ्याचे अभिनव आंदोलन.

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथील तरुण शेतकरी मंगेश साबळे याने महावितरण च्या भारनियमना विरोधात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]