Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

Mar 1, 2023

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुढीपाडवा उत्सव साजरा.. शहरात घोषासह संचलन संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुढीपाडवा उत्सव साजरा.. शहरात घोषासह संचलन संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखसहा उत्सवापैकी एक असणारा गुढीपाडवा उत्सव शहरामध्ये साजरा...

read more
१० मार्च पर्यंत ई-दर्शन पास व्यवस्थेद्वारेच दर्शन सुरु राहील ;श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव

१० मार्च पर्यंत ई-दर्शन पास व्यवस्थेद्वारेच दर्शन सुरु राहील ;श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव

शासन निर्देशानुसार मा. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी दि.०१/०४/२०२२ रोजी धार्मिक स्थळे भाविकांसाठी...

read more
सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात गुढीपाडव्यानिमित्त शैक्षणिक गुढी चे उत्साहात सादरीकरण

सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात गुढीपाडव्यानिमित्त शैक्षणिक गुढी चे उत्साहात सादरीकरण

गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षांमध्ये येतो . हिंदूंमध्ये वर्षभरात येणारे साडेतीन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]