loader image
[ays_poll id=7]

सर्व सामान्यांना होळी पूर्वीच महागाईचा चटका – घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागले

Mar 1, 2023

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. होळीपूर्वी देशातील सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे.
14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत.
8 महिन्यांनंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या असून यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती सिलेंडरच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे गेल्या वेळी जुलैमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर होत्या. आज घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलेंडर्सच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर...

read more
बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

मनमाड - 19 व्या लोकसभेत भाजपा चे व एन डी ए चे सर्वोच्च शक्तिशाली नेते नरेंद्र मोदी यांच्या...

read more
.