loader image

जनजाती कल्याण आश्रम मनमाड शाखेचे वार्षिक स्नेह-मिलन संपन्न….

Mar 1, 2023


मनमाड : हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून जनजाती कल्याण आश्रम मनमाड शाखेच्या वतीने श्री. श्रीधर सांगळे यांच्या मळ्यात स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथजी कीर्तने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सचिव श्री. संदीप भुसे, श्री. आहेर श्री. मुकेशजी मिसर होते श्री. प्रकाश गाडगीळ सरांनी प्रास्ताविक केले श्री.मुकेश मिसर सरांनी आपल्या ओघवत्या भाषेत वीर सावरकरांच्या चरित्रातील विविध पैलुंचे दर्शन घडवले श्री.भुसे यांनी वनवासी कल्याण आश्रमाचे इतिवृत्त सादर केले, दाभाडीच्या श्री.आहेर यांनी कल्याण आश्रम संघटनेच्याच वाढत्या क्रियाशीलतेची आवश्यकता प्रतिपादन केली, ज्येष्ठ नागरिक संघाच्या श्रीमती. सरला अमोलिक यांनी कनाशीच्या छात्रावासातील मुलींच्या संस्कारांचे खूप कौतुक केले, शहर अध्यक्ष श्री. प्रकाश कुलकर्णी यांनी सर्व हितचिंतकांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विवेक हातेकर यांनी केले कार्यक्रमाला मनमाड मधील विविध क्षेत्रातील सन्माननीय कार्यकर्ते सर्वश्री बबलू पाटील, दवू तेजवाणी, राकेश ललवाणी, जांभोरे साहेब, क्षीरसागर, बारसे, नितीन गवळी, नितीन पांडे ,संतोष देशपांडे, दिनेश धारवाडकर,सतिष न्हायदे, रुपेश धारवाडकर व अनेक मान्यवर उपस्थित होते , कार्यक्रमाला भगिनी वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. स्नेहमेळाव्याचे संयोजन नवनियुक्त अंश कालीन कार्यकर्ता सोनू गोधडे, गणेश व्यवहारे,हेमंत पेंडसे, शशिकांत भागवत, मोहन कीर्तने, रोहित कुलकर्णी, डी टी पवार, प्रकाश दंडगव्हाळ ,योगेश म्हस्के व श्रीधर सांगळे परिवारांनी केले .


अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित...

read more
नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.