loader image
[ays_poll id=7]

नांदगाव आणि मनमाड शहरातील नगर परिषद शाळांच्या इमारतींचे होणार नूतनीकरण – सौ अंजुम सुहास कांदे यांच्या शुभहस्ते विविध ठिकाणी भूमिपूजन

Mar 1, 2023


मनमाड नगर परिषद शाळा इमारत नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नगर विकास विभाग वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत नांदगाव व मनमाड शहरातील नगरपरिषद शाळा इमारतींच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
मनमाड शहरातील विविध नगरपरिषद शाळांना भेट दिल्यानंतर शाळांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे निदर्शनास आले, तसेच इमारत परिसरात सुशोभीकरण करणे व उत्तम वातावरण असणे गरजेचे असल्याचे संकल्पना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडे मांडली असता या विषयाची तात्काळ दखल घेत निधीसाठी पाठपुरावा केला. नगर विकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेत मनमाड सह नांदगावच्या नगरपरिषद शाळांना एकूण दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
भूमिपूजन झाले असून लवकरच शाळांचे नूतनीकरण करण्यात येईल आणि स्वच्छ सुंदर असलेल्या इमारतीत शिक्षण घेण्यासाठी चांगले वातावरण निर्माण होईल. असे सौ.अंजुमताई कांदे यांनी सांगितले.
विविध शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी स्वागत केले. आमदारांच्या माध्यमातून होत असलेल्या शाळांच्या इमारत नूतनीकरणाबद्दल शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, मनमाड शहरप्रमुख मयूर बोरसे, बांधकाम विभागाचे खैरनार, शिक्षण अधिकारी चंद्रमोरे मॅडम, महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्या जगताप, मनमाड शहर प्रमुख संगीता बागुल, नाझमा मिर्झा, मोहिनी राजाभाऊ अहिरे,मंदाताई भोसले,शाहीन शेख, सरला गोगळ, अलका कुमावत, नांदगाव शहर प्रमुख रोहिणी मोरे,डॉ.वर्षा झाल्टे,गालिबभाई शेख, आमीन पटेल, वाल्मीक आप्पा आंधळे, अज्जू भाई शेख,लाला नागरे, दिनेश घुगे,गोविंद रसाळ, धिवर बाबुजी, रुपेश आहीरे, रविभाऊ खैरनार ललित रसाळ, गोकुळ परदेशी, अमजद पठाण, मिलिंद उबाळे, लोकेश साबळे, सचिन दरगुडे, आनंद दरगुडे,अजिंक्य साळी, राहुल साबळे दीपक जोरणे, विलास परदेशी मोहसीन पठाण मजहर खान अरबाज शेख निसार पठाण चैतन्य परदेशी जमीर शेख, आसिफ भाई शेख, जय अहिरे, जॉनी जॉर्ज, प्रमोद अहिरे,विलास परदेशी,अज्जू पठाण,नितीन राजपूत,बाजीराव चव्हाण, अर्जुन सोनवणे ,संदीप निकम,गुलाब जाधव,आनंदा गवळी, नितीन वामने, निलेश व्यवहारे, कुणाल विसापूरकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.