मनमाड :येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी या आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅल्कम नातो , पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना, विद्यार्थी प्रतिनिधी अनुशा गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून, वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा असे आवाहन केले. श्री अशोक गायकवाड सरांनी आपल्या सुमधुर आवाजात विज्ञान गीत सादर केले. कुमारी अनुशा गायकवाड या विद्यार्थिनीने डॉ. सी. व्ही. रमण यांच्या विषयी माहिती सांगितली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी मोनाली चौधरी यांनी केले.

राशी भविष्य : २२ जुलै २०२५ – मंगळवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...