loader image
[ays_poll id=7]

ॲक्शन सीन शूट करतांना बिग बी जखमी

Mar 6, 2023


महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला आहे.हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. बिग बींच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत. खु्द्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून अपघाताची माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या माहितीनुसार ॲक्शन सीन शुट करताना दुखापत झाली. सध्या बिग बी मुंबई याठिकाणी त्यांच्या निवास स्थानी आराम करत आहेत.

अमिताभ बच्चन म्हणाले, ‘हैदराबाद याठिकाणी शुटिंग सुरु होती तेव्हा ॲक्शन सीन शुट करत असताना मी जखमी झालो आहे. अपघातानंतर शुटिंग रद्द करण्यात आली आहे. डॉक्टरांनी तपासणी केली आणि हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयातील डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं आहे. आता मी घरी परतलो आहे. आता काळजी करण्याचं कारण नाही. पण प्रचंड त्रास झाला. हलण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत होता…’ असं देखील बिग बी म्हणाले.
पुढे बिग बी म्हणाले, ‘प्रकृती स्थिर होण्यासाठी काही आठवडे लागतील. वेदना होत असल्यामुळे डॉक्टरांनी औषधं दिली आहेत. त्यामुळे जी कामे आहेत, ती काही दिवसांसाठी थांबवण्यात आली आहेत. मी आता जलसामध्ये आराम करत आहे. काही महत्त्वाचं काम असेल तरच चालत आहे…’

अमिताभ बच्चन कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांपर्यंत पोहोवत असतात. अनेक वर्ष सिनेमांच्या माध्यामातून चाहत्यांच्या मनार राज्य करणाऱ्या बिग बी साता समुद्रापार देखील प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या अपघाताची बातमी ऐकताच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. पण खुद्द बिग बींनी काळजी करण्याचं काही कारण नसल्याचं सांगितलं आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
.