loader image
[ays_poll id=7]

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

Mar 7, 2023


महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, राज्यभरात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे आणि पंचनामे करावेत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात

मनमाड - येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ जून २०२४ ला नवीन शैक्षणिक वर्षाची...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या प्रथम दिनी पुस्तके भेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत

मनमाड - नवीन पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा अनोखा उपक्रम...

read more
शेतकऱ्यांना वाढीव दराने  बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

शेतकऱ्यांना वाढीव दराने बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

मनमाड : नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने...

read more
.