loader image
[ays_poll id=7]

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे हिरकणी कक्षाला सुरवात

Mar 10, 2023


नाशिक : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे स्तनदा मातांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्षाला सुरवात करण्यात आली. हॉस्पिटल मध्ये रुग्णाला भेटण्यासाठी नातेवाईक येत असतात. त्याच्या सोबत लहान बालके सुध्धा असतात. अशा वेळी आई आणि बाळाची गैरसोय होत असते, हि बाब लक्षात घेऊन मेडिकव्हर प्रशासनाने निर्णय घेऊन हिरकणी कक्षाला सुरवात केली आहे. हिरकणी कक्षाचे लोकार्पण करताना मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ सुशील पारख म्हणाले कि , हॉस्पिटल मध्ये रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक भेटीसाठी किंवा ओपीडी साठी येत असतात. अशावेळी स्तनदा मातांची गैरसोय होऊ नये म्हणून, ह्या उपक्रमला आम्ही सुरवात करत आहोत. हा वातानुकूलित अद्ययावत कक्ष तळमजल्यावर असल्याने या हिरकणी कक्षाचा फायदा केवळ हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या मातांना होणार नसून हॉस्पिटल परिसरात असणाऱ्या इतर संस्थेला सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. विशेष सांगावयाचे झाल्यास खाजगी क्षेत्रात प्रथमच हिरकणी कक्ष सुरु करून आम्ही नवीन अध्यायाला सुरवात केली आहे.


या प्रसंगी मेडिकव्हर ग्रुपचे स्टेट हेड सचिन बोरसे , मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , युनिट हेड समीर तुळजापूरकर , मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर , आदींची उपस्थिती होती.


अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.