loader image
[ays_poll id=7]

मनमाड ला ठाकरे गटातर्फे चुलीवर स्वयंपाक करत केंद्र सरकारचा निषेध

Mar 10, 2023


मनमाड – घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत केंद्र सरकारने भरघोस वाढ करून महिला दिनानिमित्त महिलांना अनोखी भेट दिल्याचा आरोप करीत मनमाड शहर शिवसेना ठाकरे गटातर्फे सिलिंडर आडवे पाडून चुलीवर स्वयंपाक करीत निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

घरगुती गॅस सिलिंडर १ हजार १०३ रुपये झाल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडर साठी २ हजार ११९ मोजावे लागत असल्याने व्यावसायिक त्रस्त झाले आहे.
येथील एकात्मता चौकात शिवसेना ठाकरे गटातर्फे चुलीवर स्वयंपाक करण्याचे अनोखे आंदोलन केले. हातात भगवे झेंडे घेऊन शिवसैनिकांनी तर खाली सिलिंडर आडवे करत महिला चूल मांडून त्यावर स्वयंपाक करत केंद्र सरकारचा निषेध केला. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण होत आहे. महागाईने जनता होरपळून निघत असताना केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी तर व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये ३५० रुपयांची वाढ झाली आहे.
वाढत्या महागाईने सामान्य नागरिक बेजार झालेला आहे. मात्र, केंद्र सरकार महागाई कमी करण्याऐवजी नेहमी नवे दर जाहीर करून सर्वसामान्यांना धक्का देत आहे. कोरोना नंतर लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यातच गॅसचे दर वाढले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, माजी आमदार राजेंद्र देशमुख, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, जिल्हा संघटक संजय कटारिया, तालुका संघटक संतोष जगताप, शहरप्रमुख माधव शेलार, आशिष घुगे, सनी फसाटे लियाकत शेख, रेणुका जयस्वाल, लीलाबाई राऊत, मुक्ता नलावडे, कैलास भाबड, विनय आहेर, प्रमोद पाचोरकर, खालीद शेख, विजय मिश्रा, जावेद मन्सुरी, अनिल दराडे, कैलास गवळी, दिनेश केकान, चंद्रकांत परब, प्रकाश बोधक, अशोक सानप, लक्ष्मण गोसावी, परेश राऊत, अंकुश गवळी आदी पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.