पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी कमांडो गणेश सुखदेव गीते यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या मृतदेहाचा शोध सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार, एसपीजी कमांडो रजेवर नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मेंढी या त्यांच्या मूळ गावी आले होते. गणेश पत्नी रुपालीसह गुरुवारी सकाळी त्यांच्या गावावरून शिर्डीला दर्शनासाठी गेला होता.
गणेशच्या घरापासून 300 मीटर अंतरावर एक कालवा जातो. दुचाकीवर बसलेल्या गणेश पत्नी रुपाली व दोन लहान मुलांना घेऊन नांदूरमधमेश्वर उजव्या कालव्यावरून घराकडे वळत असताना दुचाकीच्या टाकीवर बसलेल्या मुलीचा पाय हँडलमध्ये अडकून तोल बिघडला. यामुळे तो कुटुंबासह कालव्यात पडला. लोकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली.








