loader image
[ays_poll id=7]

सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी बहरणार यंदाचा भिमोत्सव २०२३

Mar 14, 2023


मनमाड ता १३ –  शहरातील फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या व्यक्ती, संघटना, संस्थांनी एकत्र येत भीमोत्सव २०२३ या प्रबोधनात्मक, सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांची रेलचेल असलेला सात दिवसांचा उत्सव साजरा करणार आहेत. विशेष म्हणजे पावती पुस्तकेला, वर्गणी गोळा करण्याला फाटा देत उपस्थितांनी स्वतः पैसे जमा केले. यामुळे जयंती उत्सवात हा उपक्रम आदर्श ठरणार आहे.
                  
मनमाड शहरात साजरा होणारा जयंती उत्सव हा राज्यात प्रसिद्ध आहे. उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून अनुयायी येतात. एक विचारात्मक चळवळ उभी रहावी यासाठी शहरातील फुले, शाहू, आंबेडकरांना मानणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटनांनी एकत्र येत येथील इंडियन हायस्कूलच्या सभागृहात बैठक घेतली. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘भीमोत्सव २०२३’ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविले. यावेळी भीमोत्सव आयोजन समितीचे कोषाध्यक्ष, पत्रकार अमोल खरे यांनी मागील २०२२ वर्षीचा हिशोब अहवाल सादर केला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. उपस्थितांनी स्वइच्छेने स्वतः पैसे जाहीर केले तर अनेकांनी पैसे देण्याचे कबूल केल्याने एक नवा पायंडा पडला आहे. उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. या भीमोत्सवात विचारवंतांची व्याख्याने, शाहिरी, जलसा, भीमगीते, स्पर्धा आदींसह विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. मनमाड महाविद्यायातील हिंदी विभागप्रमुख डॉ जालिंदर इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अध्यक्ष अथवा कार्यकारणी न निवडण्याचा मागील निर्णय याही पुढे कायम करण्यात आला. यावेळी भीमोत्सव समितीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, निलेश वाघ, संजय कटारे, सतीश केदारे, मयूर बोरसे, पापा थॉमस, साईनाथ गिडगे, प्रदीप गायकवाड, सचिन शिरूड, भीमा महिरे, फिरोज शेख, सुनील साळवे, एड प्रदीप संसारे, एड वाल्मीक जगताप, एड सागर गरुड, अशोक बिदरी, योगेश म्हस्के, गणेश केदारे, अरुण गरुड,  सुरेश आहिरे, सुशांत केदारे, विजय उबाळे, प्रभाकर बागुल, वाल्मीक रोकडे,  नरेन संसारे आदींसह मोठ्या संख्येने आंबेडकरी विचारांचे नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.