loader image
[ays_poll id=7]

महिलांनी फुले, शाहू आंबेडकर यांचे परिवर्तनवादी विचार अंगिकारावे – प्रा.डॉ.प्रतिभा जाधव

Mar 14, 2023


मनमाड – ”६० वर्षांचा भीषण पाणीटंचाईच्या बेडीत अडकलेल्या मनमाडच्या महिलांना सत्यशोधक मंच तथा मनमाड बचाव कृती समितीने जनआंदोलने व उच्च न्यायालयातून लढे आणि राजकीय मंडळींच्या पाठबळावर करंजवन-मनमाड जलयोजना आणून मुक्तीच्या मार्गावर आणलेले आहे. हे कार्य ऐतिहासिक असून समितीच्या सर्वच महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांचा महिला दिनी सपत्नीक सन्मान केला जात आहे,हि निश्चितच गौरवास्पद बाब आहे,” असे प्रतिपादन महिला सबलीकरण व युवा जनजागृती चळवळीतील कार्यकर्त्या प्रा.डॉ.प्रतिभा जाधव यांनी केलेलं.
महिला दिनानिमित्ताने जनहित विकास संस्था आणि मनमाड बचाव कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने म.फुले अभ्यासिका व वाचनालयाच्या सभागृहात १२ मार्च रोजी ‘ महिला सन्मान ‘ सोहळ्यात प्रा.डॉ.प्रतिभा जाधव बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्त्या सुषमा तिवारी होत्या.
**”एकटी मी गेले बाई,झाड हलले नाही,
दुकटी मी गेले बाई,झाड हलले नाही,
साऱ्याजणी गेलो आम्ही, झाड राहिले नाही ”**
अशा काव्यपंक्ती गात प्रा.डॉ.प्रतिभा जाधव ह्यांनी महिलांच्या ऐक्याचा जागर केला. ” पितृसत्ताक समाज व्यवस्थेत महिलांचे सर्वच स्तरावर शोषण केले जात असून धर्म,जात, रूढी -परंपरा,व्रतवैकल्ये, पूजाअर्चा, उपवास, अंधश्रद्धा आदी कर्मकांडात महिलांना अडकवून ठेवण्यात आल्याने महिलांना त्या मानसिक गुलामगिरीत असल्याचे भानही राहिलेले नाही. फुले-शाहू-आंबेडकरांचे परिवर्तनवादी विचार व व्यवहार यांचा अंगीकार महिलांनी केला पाहिजे” असे सांगितले. यावेळी प्रा.डॉ.प्रतिभा जाधव यांनी उपस्थित महिलांना प्रश्न विचारला कि,”तुमची आवडती भाजी कोणती? ” तेव्हा उपस्थित महिलांमध्ये स्तब्धता पसरली. कुणीही उत्तर दिले नाही. तेव्हा प्रा.डॉ.प्रतिभा जाधव म्हणाल्या,”आपली आवडती भाजी कोणती हेही महिला सांगू शकत नाही. पुरुषसत्ताक समाजातील महिलांची हि मानसिक गुलामगिरीच आहे. त्यामुळे त्यांच्या विविध शैक्षणिक पदव्या ह्या कुचकामीच ठरतात. एक स्त्री म्हणून सन्मानाने जगता येईल,असे शिक्षण महिला मुक्तीचा मार्ग दाखवू शकतो. पुरुषांनी लिहिलेल्या ग्रंथातून त्यांच्याच बाजूने नियम असून महिलांवर ते लादण्यात आलेले आहेत, हे महिलांनी आता ओळखले पाहिजे. त्यासाठी संघटितरित्या प्रयत्न केलेलं पाहिजेत,” असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कोरोना काळात अद्वितीय कामगिरी बजावणाऱ्या आशासेविकांचाही सन्मान करण्या आला. मंचावर सुप्रिया पाटील ह्या विराजमान होत्या.
प्रास्ताविकातून सौ. रश्मी मोरे ह्यांनी महिलांच्या कार्याचा परिचय करून देत २७ वर्षांच्या पाण्याच्या लढ्यातील दिवंगत अशोक माळवतकर, सुनिता संसारे, दत्तात्रय व्यवहारे, संतोष बाकलिवाल आणि बिस्मिल्लाबी मन्सुरी ह्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली. पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन सौ.सुनीता महाले आणि सौ. सुवर्णा निकम यांनी केले. सत्यशोधक चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या अलका महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. सौ.बबिता चिंडालीया, सौ.रेखा येणारे, सौ. कविता मोरे,सौ. भाग्यश्री देशपांडे, कमल जाधव, सौ. पूजा केदारे, प्रिया निकुंभ-परदेशी यांनी संयोजनात योगदान दिले. जनहित विकास संस्था तथा मनमाड बचाव समितीच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी सन्मान सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.