लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे आयोजित Cyclethone 2023 ही खास महिला व मुलींसाठीची सायकल स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.या स्पर्धेत विविध शाळेच्या जवळपास ७० मुलींनी भाग घेतला,तसेच महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला. रविवार १२ मार्च रोजी सकाळी लायन्स चिल्ड्रन गार्डन आय यूडीपी येथून या स्पर्धेला सुरुवात झाली.स्पर्धेचे प्रोजेक्ट चेअरपर्सन ला डॉ निलेश राठी,ला डॉ अर्चना राठी,ला गणेश हडपे,ला सौ संगीता कदम यांनी स्पर्धकांचे स्वागत करून त्यांना स्पर्धे विषयी नियम व सूचना दिल्या. लासलगाव फाटा कमानी पर्यंत व परत लायन्स चिल्ड्रन गार्डन येत पर्यंत ही स्पर्धा संपन्न झाली.अठरा वर्षा आतील व अठरा वर्षावरील दोन गटात तीन तीन बक्षीस देण्यात आले.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.पंकज खताळ पाटील यांच्यातर्फे सर्व स्पर्धकांना एनर्जी ज्यूस चे वाटप करण्यात आले.मोठ्या गटात प्रथम बक्षीस प्रियंका बिडकर, द्वितीय क्रमांक डॉक्टर सौ नीलिमा गुजराती,तृतीय सौ नेहा गुजराती यांना मिळाले,सर्व महिला व मुलींनी या स्पर्धेचा आनंद घेतला,व क्लबच्या स्पर्धेचे आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले,बक्षीस वितरण क्लबचे अध्यक्ष ला सौ वैशाली वाणी ,ला सौ रेखा येणारे,खजिनदार ला सौ सुचिता खताळ यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी खास महिलांसाठी आहारविषयक व्याख्यान सौ जंगम मॅडम यांनी दिले.याप्रसंगी लायन्स क्लब मनमाड सिटी सदस्य ,ला पुष्पाताई मतकर,ला डॉक्टर संगीता हाके,ला सुनीता डगळे,ला शशिकांत व्यवहारे,ला डॉ प्रताप गुजराती,ला सिद्धार्थ जोगदंड,ला नितीन पवार,ला हर्षद गद्रे,ला राजेंद्र माळी,ला डॉ जे वाय इंगळे,ला वैभव कापडे,ला भारत जगताप,ला सोमनाथ जी चिंचोरे,ला स्नेहल भागवत,,ला हेमंत कातकडे इत्यादी सदस्यांनी स्पर्धेचे नियोजन केले,राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.याप्रसंगी पंकज खताळ व पत्रकार निलेश वाघ हे शुभेच्छा देण्याकरता उपस्थित होते. क्लबचे माजी रिजन चेयरपर्सन एमजेएफ लायन डॉ संजय सांगळे यांनी या स्पर्धे करता सहकार्य केले
















