loader image
[ays_poll id=7]

H3N2 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सज्ज रहावे – शिवसेनेचे निवेदन

Mar 17, 2023


H3N2 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची यंत्रणा सुसज्ज ठेवणे संदर्भात मनमाड शहर शिवसेनेतर्फे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

शिवसेना मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली मनमाड शहर शिवसेना तर्फे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुसज्ज राहावे असे निवेदन देण्यात आले.
आपल्या जिल्ह्यात इन्फ्लुएंजा व्हायरस नवीन स्वरूपात पसरत असून त्याचे लक्षण असलेले रुग्ण आपल्या शहर परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे, तसेच खाजगी दवाखाने व मेडिकल स्टोअर्स मध्ये गर्दी दिसून येत आहे, याची लक्षणे बहुतांश कोरोना प्रमाणेच असल्याने याविषयी जनतेमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने याला आळा घालण्यासाठी संभाव्य धोका टाळण्यासाठी आपल्या हॉस्पिटलची संपूर्ण यंत्रणा तसेच पुरेसा औषध साठा सुसज्ज ठेवावे व काळजीपूर्वक लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी असे निवेदन यावेळी देण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, शहर उपप्रमुख मुकुंद झालटे,रुग्ण कल्याण समितीचे महेंद्र गरुड, दिनेश घुगे, शिवसेना शहर सचिव निलेश ताठे,जयेश शस्त्रबुद्धे, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

येवला - ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात येवला तालुक्यातील बदापूर...

read more
मनमाड शहरात कडकडीत बंद

मनमाड शहरात कडकडीत बंद

मनमाड :- मराठा आरक्षणासाठी  राज्य शासनाने  काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे या...

read more
श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती माघी महागणेश उत्सव निमित्त 221 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद

श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती माघी महागणेश उत्सव निमित्त 221 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.