loader image
[ays_poll id=7]

भा. ज.पा.महिला मोर्चा तर्फे महिला दिनानिमित्त मनमाड मधील कर्तृत्ववान महिलांना ‘सुषमा स्वराज’पुरस्कार प्रदान

Mar 17, 2023


भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मनमाड मंडल, तर्फे महिला दिनानिमित्त मनमाड मधील कर्तृत्ववान महिलांना ‘सुषमा स्वराज’ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये एकूण सात महिलांना पुरस्कार दिलेत.त्यात 1)सौ.स्वाती नरेश गुजराती ह्या मनमाड येथील पत्रकार असून ‘दैनिक जनश्रद्धा’ च्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत.शिक्षण ,अध्यत्म ,कला,
वक्तृत्व,कथाकथन व विविध प्रकारचे समुपदेशन त्या करतात.
.स्त्री भ्रूण हत्या ह्या विषयावर अनेक ठिकाणी प्रबोधनपर स्वागत बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत.
2)श्रीमती सुषमा रामप्रसाद तिवारी
ह्या आदर्श पुरस्काराने सन्मानित आहेत शिवाय ‘मनमाड बचाव कृती समितीच्या’अध्यक्ष आहेत ,मनमाड मधील जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्ना बाबत मनमाड-करंजवन जलयोजने अंतर्गत विशेष सहभाग,आंदोलने, उपोषण आदी उपयाद्वारे जनलढा दिला.
3)सौ.वैष्णवी विजय पुरंदरे
ह्या गृहिणी असून त्यांच्यामध्ये उत्तम संघटन कौशल्य आहे.मनमाड मधील 250 महिलांचे ‘वेदिका ‘मंडळ स्थापन करून त्याद्वारे विविध उपक्रम राबविले जातात.नववर्ष पाडव्याला मोठी नववर्ष स्वागत यात्रा ,मंगळागौरीचे विविध खेळ, भिशी,हळदीकुंकू,भजनी मंडळ इ.अत्यंत शिस्त बद्ध पद्धतीने.
4)सौ.साधना सुधीर पाटील
लायनेस क्लब सेक्रेटरी पदावर असताना बेस्ट सेक्रेटरी पारितोषिक,मनमाड सिटी प्रेसिडेंट पदावर असतांना अनेक गरजू लोकांसाठी सेवा दिल्यात शाळांमध्ये गणवेश वाटप,आदिवासी पाड्यांवर जाऊन त्यांना लागणारे सेवाकार्य,मनमाड शहरात महिलांसाठी पहिला डिस्ट्रिक्ट पहिला महिला क्लब 19 ऑगस्ट 2021 रोजी स्थापन करून त्याच्या संस्थापक अध्यक्षांचा बहुमान मिळवला.
5)सौ. सुनीता राम महाले
ह्या मनमाड मधील ‘कळ्यांची निगराणी’ह्या मतिमंद आणि गतिमंद मुलांच्या शाळेच्या संस्थापक आहेत.स्वतःचा मुलगा गतिमंद जन्माला आला याचे दुःख काळजात लपवत मतिमंद मुलांसाठी चे विशेष प्रशिक्षण घेऊन त्या अनेक अश्या मानसिक विकलांग मुलांच्या आई बनल्या आज त्यांच्या शाळेत 150 मानसिक अपंग मुले शिक्षण घेत आहेत.
6) डॉ.सौ वर्षा शंकर झालटे
ह्या BHMS डॉ. आहेत .रौनक फाऊंडेशन ह्या संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. Covid मध्ये 11 शव 5 महिला आणि 6 पुरुष यांचे स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले.मोफत औषधोपचार,वाड्या वस्त्यांवर जाऊन लोकांची मोफत तपासणी.1921 मध्ये ))राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त,अन्याया विरुद्ध लढण्यात अग्रेसर.,सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेहेमी पुढे.
7) सौ.अनिता निलेश इंगळे.
ह्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष.त्या माध्यमातून अनेक सेवाभावी कार्य केलेत.12 ते 15 बचत गटांमार्फत महिला सबलीकरण. संस्थेमार्फत प्रभागातील महिलांच्या कायम संपर्कात.महिला सबलीकरणासाठी हळदीकुंकू,मनोरंजनाचे कार्यक्रम यावर चर्चासत्रे यांचे आयोजन.रमाई आवास योजने अंतर्गत निराधार गरजू लोकांना घरे मिळवून दिले.पिवळे रेशनकार्ड, विधवा पेन्शन योजना,निराधार पेन्शन योजना यांच्या माध्यमातून कार्य.
अश्या बहुआयामी ,बहुरंगी वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी करून आपला ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा समावेश आहे. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेचे पूजन करून ‘ वेद मंत्राहुनी आम्हा वंद्य वंदे मातरम’ह्या गीताने वाद्यांच्या साथीने करण्यात आली. हे गीत वर्षा मुळे आणि किशोरी मुळे यांनी गायले.श्री.विजयकुमार गांगुर्डे सर यांनी हार्मोनियमची साथ केली.ह्या कार्यक्रमासाठी मनमाड मधील महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार,उत्तम साहित्यिक,कवी, लेखकअसे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले, छत्रे न्यू इंग्लिश स्कुलचे उपप्राचार्य श्री.संदीप देशपांडे सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. महिलांच्या अंगी असणाऱ्या विविध गुणांवर प्रकाश टाकून एक कविता सादर केली.तसेच ह्या कार्यक्रमासाठी मनमाड येथील रेल्वे सेक्शन इंजनियर शिरसाठ साहेब यांच्या पत्नी देखील प्रमुख पाह्यन्य म्हणून लाभल्या.त्यांनी देखील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. व्यसपीठावर मनमाड मंडल अध्यक्ष जयकुमार फुलवानी, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन भाऊ पांडे,अल्पसंख्याक आघाडी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जलील भाऊ अन्सारी , महिला मोर्चा मनमाड मंडल अध्यक्ष सोनिताई पवार,सरचिटणीस स्नेहल भागवत,जयश्री कुंभार,संगीता कदम, उपाध्यक्ष बरखा लखन, नजमा अन्सारी,अक्षदा पगारे उपस्थित होते. अपंग आघाडी महिला हिना बागवान व सुनीता वानखेडे तसेच बूथ प्रमुख नगमा पठाण,हशरात शेख, मेहरुना शेख,साहिन शेख ह्या देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मंडल सरचिटणीस सौ.संगीता कदम यांनी केले. पुरस्कारार्थी सर्व महिलांनी मनोगत व्यक्त केले.तसेच नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीनभाऊ पांडे यांनी उपस्थित महिलांना माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमासाठी मनमाड मधील वेदिका महिला मंडळ,जेसीस,रणरागिणी महिला क्लब व इतर अनेक क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित होत्या . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनमाड मंडल अध्यक्ष जयकुमार फुलवानी,कोषाध्यक्ष आनंद काकडे,संघटन सरचिटणीस नितीन परदेशी अपंग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भाऊ पगारे , सामाजिक सद्भावना सहसंयोजक राजुभैया पवार,महिला मोर्चा शहराध्यक्ष सोनिताई पवार यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले. कोषाध्यक्ष आनंद काकडे यांनी कार्यक्रमासाठी त्यांचा हॉल उपलब्ध करून दिला.तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन आणि सुत्रसंचलन नाशिक जिल्हा महिला मोर्चा ग्रामीण च्या सरचिटणीस सौ.स्वाती मुळे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.