loader image
[ays_poll id=7]

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची येवला भाजपची मागणी

Mar 19, 2023


येवला – राजकीय षडयंत्राच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी व पक्षांच्या कार्यकर्त्यांवर बिनबुडाचे खोटे आरोप करून पक्षा बद्दल, वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या बद्दल अर्वाच्य भाषेत अपशब्द वापरणाऱ्या गावगुंडाच्या विरोधात येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. शनिवार दि.१८ मार्च २०२३ रोजी येवला तालुक्यातील काही व्हाट्सएपच्या ग्रुपवर तथाकथित शेतकरी गावगुंड कृष्णा डोंगरे यांचे काही व्हिडियो क्लिप त्यांच्या स्वतःच्या नंबर वरून प्रसारीत करण्यात आल्या त्या क्लिप मध्ये त्यांनी शेतकरी आंदोलन केले म्हणून माझ्या भावावर हल्ला झाल्याचे नमूद केले व हा हल्ला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला असे खोटे व बिनबुडाचे आरोप केले. भाजपा पक्षाला व शेतकरी हिताचे संरक्षक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांना अर्वाच्य भाषेत अपशब्द वापरत राजकीय गरळ ओकत समाजात संभ्रम पसरवत खोटी प्रसिद्धी मिळवण्याचा अट्टहास केला आहे.त्यांच्या भावावर झालेला हल्ला हे अंतर्गत वादातून झालेला असून डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीतील व्यक्तींचा व भाजपाचा कुठलाही संबंध नसतांना राजकीय षडयंत्राच्या माध्यमातून वैयक्तिक प्रसिद्धीसाठी व सहानूभूती मिळवण्यासाठी बेछूट आरोप करीत आहे.
अशा गुंड प्रवृत्तीच्या तथाकथित शेतकरी कृष्णा डोंगरे व त्याचा भाऊ शंकर डोंगरे यांच्यावर जिल्हाभर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून यांच्या नावावर कोणतीही शेत जमिन नाही हे तथाकथित शेतकरी कायमच भाजप सरकार राज्यात आल्यानंतर भाजप विरोधी आंदोलन करून प्रसिद्ध झोतात येण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात व त्या साठी खोटे प्रसंग तयार करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. सदरील घटनेचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी व कृष्णा डोंगरे यांनी भारतीय जनता पार्टी व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या अवमानकारक वक्तव्य बाबत गांभीर्याने कारवाई व्हावी व हे शिवशाही सरकार शेतकरी विरोधी भासवण्याचा कट उधळून लावावा. वरील गावगुंड तथाकथित शेतकरी यांचे या आधीचे सर्व रेकॉर्ड तपासुन कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन
आनंद शिंदे जिल्हा उपाध्यक्ष,
बाबासाहेब डमाळे
प्रांतिक सदस्य,
समीर समदडिया
विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष
राजेंद्र परदेशी
ओबीसी जिल्हा सरचिटणीस,
तरंग गुजराथी शहराध्यक्ष,
दिनेश परदेशी युवा नेते,
प्रा.नानासाहेब लहरे,
चेतन धसे,
बापु गाडेकर,
सागर नाईकवाडे,
अकील शाह
संतोष केंद्रे,
छगन दिवटे,
बडा अण्णा शिंदे,
बाळासाहेब कुऱ्हे,
गजानन चव्हाण,
जगदीश पटेल,
संतोष मुथा,
महेश पाटील,
अमोल ढमाले,
वृषाल डमाले,
गजानन चव्हाण,
युवराज पाटोळे,
अकील शाह,
चेतन धसे,
मच्छिन्द्र हाडोळे,
सुनिल पवार,
भिमा मांजरे,
नवनाथ गाडे,
आदेश काळे,
प्रशांत सोनवणे,
सुनिल बाबर,
दिपक टकले,
सागर भावसार,
वैभव खेरूड,
विशाल हारके, यांनी दिले आहे


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
.