एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग. बालविकास प्रकल्प अधिकारी मा.श्री.वाकडे सर तसेच मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली पोषण पंधरवडा २०२३चे आज उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२३ हा दिनांक २० मार्च ते ०३ एप्रिल पर्यन्त राबविण्यात येणार आहे.उपस्थित पालकवर्ग यांना पोषण पंधरवाड्यातील राबविण्यात येणाऱ्या थिमविषयी माहिती दिली.
१)श्री अन्नाचा/भरड धान्याचा प्रचार आणि प्रसार करणे
.२) स्वस्थ बालक स्पर्धा आयोजित करणे(,स्वस्थ बालकांसाठी उत्सव)
३)सक्षम अंगणवाड्याची लोकप्रियता वाढविणे. या थिमच्या माध्यमातुन जनजागृती केली जाणार आहे. कुपोषण हे विविध घटकांच्या परीणामामुळे होते .त्यामुळे विविध माध्यमातुन लोकांचा सहभाग वाढवुन पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणला तर निश्चितच कुपोषणावर आळा घालण्यासाठी महत्वपुर्ण ठरणार आहे..तसेच गृहभेटीच्या माध्यमातुन पोषण पंधरवड्याविषयी जनजागृती करण्यात आली. सर्वासाठी पोषण ,निरोगी भारताकडे एकत्रित वाटचाल करणे हेच या पंधरवड्याचे लक्ष आहे .
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात
मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...











