Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

Mar 29, 2023

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले. साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्‍दारावर काल्‍पनिक भव्‍य देखावा उभारण्‍यात आलाय.

अजून बातम्या वाचा..

शालेय शैक्षणिक उपक्रम अंतर्गत एच.ए.के.हायस्कूल & ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची एफ.सी.आय.मध्ये क्षेत्र भेट

शालेय शैक्षणिक उपक्रम अंतर्गत एच.ए.के.हायस्कूल & ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची एफ.सी.आय.मध्ये क्षेत्र भेट

मनमाड : एच.ए.के. हायस्कूल & ज्यु. कॉलेज, मनमाड विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी...

read more
अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे रशियात अनावरण : निर्भय महिला सामाजिक संस्थेतर्फे जल्लोष

अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे रशियात अनावरण : निर्भय महिला सामाजिक संस्थेतर्फे जल्लोष

(सुभाष जाधव)दीनांक 14-9-2022 रोजी साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे रशियात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]