loader image
[ays_poll id=7]

शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

Mar 29, 2023


शिर्डी येथील साईबाबा मंदिरात साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले. साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्‍दारावर काल्‍पनिक भव्‍य देखावा उभारण्‍यात आलाय.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
.