कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत दिले जाणार आहे.
कांद्याच्या दरात घसरण झाल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं प्रतिक्विंटल 350 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत दिलं जाणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केला त्याच ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे. 30 दिवसात हे अनुदान वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या काळासाठीच मिळणार अनुदान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने 350 रुपये प्रतिक्विंटलप्रमाने कांदा उत्पादन शेतकऱ्यांना मदतीचे आदेश जारी केले आहेत.
कांद्याचे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही कागदपत्रे आवश्यक आहेत. यामध्ये कांदा विक्री केलेल्याची पावती असणं आवश्यक आहे. तसेच सातबारा उतारा त्याचबरोबर बचत खाते पासबुक गरजेचं आहे. या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्याला प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.