मनमाड शहराच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्या ॐ मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे सन 1986 पासून सलग 37 व्या वर्षी यंदाही गुरुवार दिनांक 30/03/2023 चैत्र शुध्द नवमी श्रीरामनवमी निमित्त आठवडे बाजार श्रीराम मंदीर येथे भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात सकाळी 7.00 वाजता श्रीराम,लक्ष्मण माता सिता व हनुमान यांच्या मुर्तीस महाअभिषेक, दुपारी 12.00 वाजता श्रीराम जन्माचे भजन व श्रीराम जन्मोत्सव सायंकाळी 5.30 वाजता श्रीराम रथाची भव्य श्रीराम रथयात्रा (नगरप्रदक्षिणा) रात्री 9.00 वाजता महाआरती अशा कार्यक्रमांचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती 2023 तर्फे करण्यात आलेले आहे. वरील सर्व धार्मिक कार्यक्रमांना व भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणुकीस मनमाड शहरातील व परिसरातील सकल हिंदू समाज बांधव,हिंदुत्ववादी पक्ष संघटना, संस्था यांच्या आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी व हिंदु बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे नम्र आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती -2023 च्या वतीने करण्यात आले आहे.

राशीभविष्य : १५ ऑक्टोबर २०२५ – बुधवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....