loader image
[ays_poll id=7]

नवरीची पुस्तक तुला करून ग्रंथ आणि पुस्तके ग्रंथालयाला दिली भेट – वधू पित्याची अशीही संकल्पपूर्ती

Mar 30, 2023

अंजनगावसुर्जी तालुक्यातील कारला येथे एक आगळा-वेगळा आणि रुढी-परंपरेला फाटा देणारा विवाह संपन्न झाला. महामानवांच्या विचारांनी प्रेरीत झालेले दाळू अणि पोळकट या दोन कुटुंबांनी या योग जुळून आणला. दाळू यांच्या कुटुंबातील मुलगी आणि पोळकट यांच्या कुटुंबातील मुलगा यांचा ऋणानुबंध जोडणारा शिवमंगल सोहळा म्हणून त्याकडे पाहिले जाते.

वाजंत्री, फटाके, अहेर, हार-तुरे यावर होणारा अनाठायी खर्च टाळत शिवमंगल परिवर्तनशील शिवविवाह सोहळ्याची विशेषतः म्हणजे मुलीचे वडील शिवदास दाळू यांनी हुंडा पध्दत नाकारत साध्या पद्धतीने विवाह केला. लग्नसमारंभात होणाऱ्या खर्चात बचत करुन जावई वैभव आणि मुलगी क्रांती हिला हुंड्यात सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या ग्रंथालयाला ग्रंथ व स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्याचा संकल्प केला होता. त्याची संकल्पपुर्ती यावेळी करण्यात आली. त्यासाठी लग्नविधीदरम्यान नवरीची ग्रंथतुला करण्यात आली. या शिवविवाह सोहळ्याला प्रसिद्ध समाज सुधारक सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज, आमदार देवेंद्र भुयार, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर, विजयभाऊ सारभुकन, संदीपपाल महाराज, रामपाल महाराज आदी मान्यवरांसह दोन्ही कुटुंबीयांचे नातेवाईक उपस्थित होते.

दरम्यान विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या वऱ्हाडी मंडळींसह उपस्थित शाळकरी मुला-मुलींना भेट म्हणुन राष्ट्रसंतांची ग्रामगीता, महामानवांची पुस्तके देण्यात आली. या आगळ्या-वेगळ्या व परंपरेला फाटा देणाऱ्या लग्नसोहळ्याची तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

  मनमाड:- एच.ए. के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये शाळेचे पर्यवेक्षक शाहिद अख्तर अन्सारी...

read more
धुळे मुंबई एक्सप्रेसला  मनमाडकरांसाठी तीन अतिरिक्त बोगी राखून ठेवाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

धुळे मुंबई एक्सप्रेसला मनमाडकरांसाठी तीन अतिरिक्त बोगी राखून ठेवाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मनमाड रेल्वे स्थानक महत्त्वपूर्ण जंक्शन असून या स्थानकातून रोज नाशिक मुंबई आदी ठिकाणी मोठ्या...

read more
मनमाड, नाशिक येथील प्रवाशांसाठी मुंबई – मनमाड स्पेशल ट्रेन सुरू करावी खासदार हेमंत गोडसे यांची केंद्रिय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

मनमाड, नाशिक येथील प्रवाशांसाठी मुंबई – मनमाड स्पेशल ट्रेन सुरू करावी खासदार हेमंत गोडसे यांची केंद्रिय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

नाशिक - रेल्वे प्रशासनाने नव्याने आखलेल्या रेल्वे गाड्यांच्या टाईमटेबलमुळे नाशिकसह मनमाडकरांवर...

read more
मंगळणे येथील आदिवासी महिला सरपंचाचे तीन महिन्याच्या बाळासह बेमुदत उपोषण सुरूच.

मंगळणे येथील आदिवासी महिला सरपंचाचे तीन महिन्याच्या बाळासह बेमुदत उपोषण सुरूच.

नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील अदिवासी महिला सरपंचाच्या उपोषणाचा आज सातवा...

read more
.