Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कांदा पिकाची ई. पिक नोंदीची जाचक अट त्वरीत रद्द करावी – कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

Apr 3, 2023

नांदगाव – (सोमनाथ घोंगाणे)
महाराष्ट्र शासनाने कांदा पिकासाठी ३५० रूपये क्विंटल अनुदान जाहीर केले पण सातबारा उताऱ्यावर ई पिक पेरा नोंद बंधनकारक केल्याने सुमारे ९० % शेतकर्यांची ई पिक नोंद नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. सदर अट त्वरीत रद्द करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, कांदा उत्पादक संघटना यांचेकडून आज तहसिलदार नांदगाव यांना निवेदन देण्यात आले.
राज्य कांदा उत्पादक संघटनेचे सोमनाथ मगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश चव्हाण,परशराम शिदें,विशाल वडघुले,योगेश वाघ,भाऊसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी पिक पेरा ई नोंद ही अट त्वरीत करावी व सरसकट सर्व कांद्याला अनुदान देण्यात यावे. तसे यंत्रणेला त्वरीत आदेश देवून पीक नोंदणीचे कामकाज करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

रोटरी महिला क्लब व ईगल फिटनेस क्लब मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त PCOS & PCOD व आरोग्य विषयक जागरूक व्याख्यान संपन्न

रोटरी महिला क्लब व ईगल फिटनेस क्लब मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त PCOS & PCOD व आरोग्य विषयक जागरूक व्याख्यान संपन्न

संपूर्ण जगभरात ०८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ह्याच दिनाचे औचित्य साधून...

read more
मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा

मनमाड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा

दिनांक 10/03/ 2022 रोजी म. गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]