loader image

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे “बॅक टू द रूट्स” या थीमसह जागतिक आरोग्य दिन साजरा

Apr 7, 2023


अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये “बॅक टू द रूट्स” या थीमच्या धर्तीवर योग आणि सूर्यनमस्कार करून जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

नाशिक : जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल २०२३ रोजी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जनसामान्यांमध्ये आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) जागतिक आरोग्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिन “सर्वांसाठी आरोग्य” या थीमसह यंदा साजरा करत आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर, निरोगी आरोग्यासाठी लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या निरोगी जीवनशैलीच्या सवयी आणि त्यांचे पालन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स ने “बॅक टू द रूट्स” ही थीम सादर केली.

भारतीय संस्कृती आणि परंपरांना वैज्ञानिक ज्ञानाचे वरदान लाभले आहे. आपले पूर्वज अनेक वर्षांपासून निरोगी शरीर आणि मानसिक आरोग्यासाठी या प्राचीन आयुर्वेदिक परंपरांचे पालन करत आले आहेत. आजच्या पिढीला निरोगी जीवन जगता यावे आणि विविध आजार होण्यापासून रोखता यावे यासाठी भारतीय पारंपारिक राहणीमानाच्या महत्त्वाविषयी जागरुकता पसरवणे हे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल चे उद्दिष्ट आहे. भारतीय पारंपारिक पद्धतींने तयार केलेले दुधाचे पदार्थ तयार करून खाणे किंवा पिणे जसेकी ताक पिणे , मातीच्या भांड्यात अन्न शिजवणे, घरात प्रवेश करण्यापूर्वी शूज आणि चप्पल बाहेर ठेवणे, हाताने खाणे, बसून अन्न आणि पाणी पिणे, घरी बनवलेले अन्न खाणे, रात्रीचे जेवण लवकर खाणे, लवकर निजणे व सकाळी लवकर उठणे. याचा समावेश होतो.

याप्रसंगी बोलताना मेडिकल डायरेक्टर डॉ. सुशील पारख, म्हणाले, “आधुनिक औषधाचे फायदे आहेत, परंतु आपण आपल्या पूर्वजांकडून बरेच काही शिकू शकतो, Tyani निरोगी राहण्यासाठी नैसर्गिक उपायांवर आणि साध्या जीवनशैलीत बदल केला. या वर्षीच्या जागतिक आरोग्य दिनासाठी रूट्स ही एक उत्कृष्ट थीम होती, जी आम्हांला निसर्गाशी पुन्हा कनेक्ट होण्यासाठी आणि शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या एकूण आरोग्यामध्ये सुधारणा करणार्‍या जुन्या पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहित करते.”

“मला आशा आहे की बॅक टू द रूट्स थीमने लोकांना आपल्या समृद्ध भारतीय संस्कृती आणि परंपरेची जाणीव करून दिली आहे आणि यामुळे आपल्या पूर्वजांना सक्रिय जीवनशैली जगण्यास कशी मदत झाली आहे. या मोहिमेचा प्रसार व प्रचार करून, मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे उद्दिष्ट लोकांना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करणे आणि निरोगीपणा अंगीकारणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन स्टेट हेड सचिन बोरसे यांनी केले.

जागतिक आरोग्य दिनाच्या मोहिमेत प्रत्येकाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल ने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर टिप्पणी करणाऱ्या प्रत्येकाला मोफत आरोग्य तपासणी कूपन ऑफर केले आहे, जे जेष्ठ नागरिक आरोग्य बाबत जागरूक तर आहेत परंतु नियमित व्यायाम आहार व विहार करतात. या कार्यक्रमास डॉ उज्वला बाविस्कर यांनी योग व सूर्यनमस्कार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिक डॉ रेश्मा बोडखे यांनी केले .या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सेंटर हेड समीर तुळजापूरकर , मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर , ऑपरेशन हेड आशिष सिंग , एच आर हेड नीरज नायर , नर्सिंग हेड राजेश कुमार , यांची होती . त्याच बरोबर प्रवीण पगार , शिवकुमार रोहाडे , संदीप सांगळे , चेतन कुलकर्णी , गॅब्रिएल स्वामी यांचे विशेष सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन विश्वानंद साळवे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
.