मनमाड :- भारतीय जीवन विमा निगम,मनमाड कार्यालय मार्फत एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज,मनमाड मध्ये माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभागातील प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थ्याची शिस्त व गुणवंतेच्या आधारे निवड करून शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,संस्थेच्या सदस्या आयशा सिद्दीका सलीम गाजियानी,पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर,शेख आरिफ कासम व भारतीय जीवन विमा निगम मनमाड कार्यालयाचे शाखाधिकारी अरुण सोनवणे,विमा प्रतिनिधी गजानन नागरे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ‘सर्वोत्कृष्ट छात्र’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक शानुल जगताप सर,उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले.