loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Apr 12, 2023


 

 

मनमाड : योगेश म्हस्के -शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मनमाड शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली , सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे आणि आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या जोतिबा फुले यांना जनतेने महात्मा पदवी बहाल केली.

साताऱ्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ रोजी जोतिबा फुले यांचा जन्म झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा जोतिबांनी निश्चय केला. इ.स. १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत असणाऱ्या भिडे वाड्यात मुलींची पहिली मराठी शाळा जोतिबांनी स्थापन केली. या शाळेतील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपविली. यानंतर जोतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली . जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जनतेने त्यांना मुंबईतील एका सभेत इ.स. १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे जोतिबा फुले हे ‘महात्मा फुले’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

मनमाड शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली , शहरातील महात्मा फुले चौक येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा फुले माळी समाज मित्र मंडळ , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , फुले-शाह-आंबडेकर मुस्लीम विचार मंच , संस्कृती संवर्धन समिती , भीमोत्सव समितीचे सदस्य आणि शहरातील अनेक सामाजिक, राजकीय संघटना आणि महात्मा फुले प्रेमी नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांची नियुक्ती

सालाबादाप्रमाणे नांदगांव शहारातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा)...

read more
सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

सिद्धी क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तसेच शालेय परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेत...

read more
बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

बघा व्हिडिओ : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवास आज पासुन प्रारंभ – श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाडच्या दिशेने नाथज्योतीचे प्रस्थान

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची मनमाड येथील महर्षी...

read more
.