नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण सह परिसरातील दि.९ रोजी रविवारी गारपीट झाल्याने शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले.विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांनी बुधवारी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पिकांची व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या वतीने जातेगांव येथील माजी सरपंच नारायण पवार यांनी गारपीट झाल्याने शेतकरी बांधवांचे कांदा, मका, आंबा, भाजीपाला इत्यादी पिकांचे नुकसानी बाबत व्यथा मांडली. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ना. दानवे म्हणाले की, चांदवड, मनमाड, नांदगाव तालुक्यात द्राक्ष, कांदा व टोमॅटो आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर गारपीट व बेमोसमी पावसाने १००% नुकसान झाले असून शेतकरी संपूर्ण उध्वस्त झाला आहे.
शासनाने सर्व निकष बाजूला सारून पंचनाम्याची वाट न बघता तात्काळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे शेतकरी बांधवांच्या वतीने मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच लाल कांद्याला प्रती क्विंटल ३५० रुपयांचे अनुदान जाहीर केले असून त्यासाठी ७/१२ उतार्यावर ऑनलाईन पिकपेरा असणे गरजेचे आहे, व एका शेतकऱ्याला २०० क्विंटल कांद्यासाठीच अनुदान देण्यात येणार असे जाहीर केले. ही शेतकऱ्यांची शासनाने एक प्रकारे थट्टा केली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी खरीपातील लाल कांदा पिकवला व बाजार समिती मध्ये विकला त्यांच्याकडे शेताचा उतारा आहे. त्यांच्या ७/१२ उतार्यावर ऑनलाईन नोंद असो किंवा नसो त्यांना मदत मिळने गरजेचे आहे. परंतु सरकार किचकट अटी शर्ती मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असे एकंदरीत चित्र आहे. यामध्ये स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांची काही चुक नसते कारण अशा आसमानी संकट येते त्यावेळी शासनाने त्यांना राज्यातील कोणत्या भागातून किती टक्के नुकसान दाखवायची याबाबत सुचना देण्यात आलेल्या असतात.
नाशिक जिल्ह्यातील गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली असून अतिशय भयंकर प्रकार घडला आहे.उद्या छत्रपती संभाजी नगर, बीड जिल्ह्यातील व इतर ठिकाणी देखील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून विधानसभेत शेतकरी बांधवांना तात्काळ भरीव मदत करावी अशी मागणी केली जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार सिध्दार्थ मोरे कृषी अधिकारी जगदीश पाटील गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्यासह, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, तालुका प्रमुख संतोष गुप्ता, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र नहार, संतोष बळीद, संजय कटारिया, प्रविण सुर्यवंशी, विजय मिश्रा, बाळासाहेब चव्हाण, अमित नहार, राजेंद्र सोनवणे, रामदास पाटील, आयुब शेख, नाना थोरात, शिवसेना तालुकाप्रमुख कन्नड संजय मोटे, जालिंदर गायकवाड, ऊप तालुकाप्रमुख अजय जाधव, बाबासाहेब शिंदे, निपाणीचे सरपंच पंढरीनाथ कदम उपविभाग प्रमुख, ज्ञानेश्वर बोरसे, बळीराम बोरसे आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...