भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागेवर रमेश बैस यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मात्र, आता रमेश बैस यांना देखील लवकरच राज्यपाल पदावरून कार्यमुक्त केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. तशा हालचाली भाजपमध्ये सुरु झाल्या आहेत.
राज्यपाल रमेश बैस यांना कार्यमुक्त केल्यानंतर महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार आहेत. त्यामुळे राज्यात नवे राज्यपाल म्हणून कोण येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्तीसगडमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन कार्यमुक्त केले जाणार आहे. छत्तीसगड जिंकण्यासाठी बैस यांना कार्य़मुक्त केले जाणार असल्याची चर्चा आहे.
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे.
राज्यात भाजपकडे रमेश बैस यांच्यासारखा प्रभावी चेहरा नाही.
त्यामुळे रमेश बैस यांच्याकडे या निवडणूकीची जबाबदारी देण्याचा भाजपचा भर आहे.
रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कार्यमुक्त केल्यानंतर त्यांच्या जागेवर कोण येणार?
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच महाराष्ट्रातही निवडणुका होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या नेत्याला राज्यपाल म्हणून पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे भाजपच्या पुढील राजकीय खेळीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.