loader image
[ays_poll id=7]

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मनमाड शहरात उत्साहात साजरी

Apr 15, 2023

मनमाड : योगेश म्हस्के – भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधरक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.

यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती , मनमाड शहरामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सर्वधर्मीय नागरिक हे बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतात. यंदाच्या वर्षी देखील विविध कार्यक्रमाद्वारे जयंती साजरी करण्यात आली , डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला आकर्षक अशी विद्युतरोषणाई करण्यात आली असुन , 14 एप्रिलच्या पुर्व रात्रीला 12 वाजता शहरातील भीम अनुयायी आणि प्रेमींनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. डॉ बाबासाहेब आंबडेकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन आतिषबाजी करण्यात आली , शहरातील विविध सामाजिक संघटना आणि संस्थेच्या वतीने महामानव यांची जयंती साजरी करण्यात आली , शहरामध्ये भीमोत्सव समितीच्या वतीने देखील 11 , 12 आणि 16 , 17 , 18 एप्रिल रोजी नावाजलेले समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त करण्यात आले आहे.

शहरातील रेल्वे कारखाना येथे सर्व रेल्वे कामगार संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली ,
सायंकाळी शहरातील सर्वच परिसरातून जवळ-जवळ 30 ते 40 विविध सामाजिक विषयांचे देखावे सादर करून चित्ररथ काढण्यात आले. यावेळी मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.