loader image
[ays_poll id=7]

तेज कवडे यांची बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार

Apr 19, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल १४ वर्षे सभापती असलेल्या तेज प्रकाश कवडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने बाजार समिती निवडणूकीत राजकीय भुकंप

नांदगाव बाजार समितीची निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र माघार घेण्यास दोन दिवस शिल्लक असतानां तालुक्यातील सहकार महर्षी जेष्ट नेते प्रकाश ( बापूसाहेब ) कवडे यांचे चिंरजीव तेज कवडे यांनी निवडणूकी तून अचानक माघार घेतल्याने तालुक्यात राजकीय भुकंप झाला असून यामध्ये काय गुढ दडलयं अशा चर्चेला उधाण आले असून भविष्यात तालुक्यात काय घडामोडी घडतील हे ही सांगता येत नाही.
तेज कवडे यांनी १४ वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम केले आहे. तसेच जेष्ट नेते सहकार महर्षी बापूसाहेब कवडे यांनी ५ वर्ष अशी तब्बल १९ वर्ष कवडे यांच्या कडे बाजार समितीची एकहाती सत्ता होती .

आज त्यांनी दोन्ही गटातून माघार घेतली आहे. यामध्ये निश्चितच काही गुढ दडलयं का? आणि भविष्यात कोणता 
राजकीय भुकंप होईल का? अशी कुजबूज मतदार संघात सुरू झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र माघार घेणेसाठी (दि. 20) तारीख मुदत असल्याने आज रोजी माजी सभापती तेज कवडे यांनी दोन्ही गटातून आपले नामनिर्देशन पत्र माघार घेतले तसेच समाधान पाटील, कैलास पाटील, भाऊसाहेब काकळीज यांनी एका गटातून माघार घेतली .
तेज कवडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत बाजार समितीचे कामकाज हायटेक पध्दतीने व पारदर्शक केल्याने बाजार समितीचा नावलौकीक महाराष्ट्रा मध्ये गाजत आहे .
नांदगाव बाजार समिती साठी दोन पॅनल होणार हे जवळपास नक्की झाले असून सत्ताधारी गटाचे आमदार  सुहांंस कांदे व जेष्टनेते बापूसाहेब कवडे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल तर महाविकास आघाडीचे जगन्नाथ धात्रक, माजी आमदार  अँड.अनिल आहेर ,पंकज भुजबळ ,राजेद्र देशमुख , संजय पवार  दुसऱ्या पॅनलमध्ये असणार आहे.
सोसायटी गटातून ११ जागा, ग्रामपंचायत गटातून ४ जागा,  व्यापारी गटातून २ जागासाठी तर  हमाल मापारी गटात १ जागा अशा १८ जागांसाठी सदर निवडणूक होणार असून सर्वच गटात गटा – तटाच्या राजकारणा बरोबर जातीचा निकषावर  भर दिला जाणार असल्याचे दिसून येत आहे. याला अपवाद व्यापारी गट असून व्यापारी गटात जैन / ओसवाल / माहेश्वरी समाजा बरोबरच माळी समाजाचे एक गठ्ठा मतदार असून सत्ताधारी आ. कांदे गटा कडून एकाच माहेश्वरी समाजाचे दोन उमेदवार नक्की झाले असून विरोधी महाविकास आघाडीने माळी समाजाचा उमेदवार दिला असून  जैन व ओसवाल समाजाला सत्ताधारी गटाने उमेदवारी न दिल्याने हे दोन्ही मोठे समाज नाराज झाल्याने याचा फटका बाजार समितीच्या निवडणूकी बरोबरोच पुढील येणाऱ्या निवडणूकीत कुणाला बसणार आहे. हे येणारा काळच ठरवेल.

अजून बातम्या वाचा..

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.