loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा रहेनूमा फाउंडेशनच्या वतीने शिरखुर्मा वस्तु वाटप

Apr 19, 2023


रमजान ईद निमित्त आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या माध्यमातून लोकप्रिय आमदार सुहास आण्णा साहेबांच्या मदतीने नांदगाव शहरात आणि आजू बाजूच्या खेड्या पाड्यातील मुस्लीम समाजातील गरीब, निराधार, विधवा, गरजवंत कुटुंबाला शिरखुर्मा साठी आवश्यक सुखामेवा वस्तूंचा किट तयार करून स्थानिकांच्या शिफारशी व सुझाव नुसार गरीब गरजवंत कुटुंबांना घरपोच वाटप करण्यात आले.
मुस्लीम धर्मीयांचा वर्षातील सर्वात मोठा सण “ईद-उल-फित्र” साजरा होत असताना आपल्या अवती भोवती असलेल्या गोर -गरीब कुटुंबांची ही ईद गोड व्हावी या उदार हेतूने आमदार सुहास आण्णा साहेबांच्या मदतीने शहरातील तसेच तालुक्यातील न्यायडोंगरी,परधडी, जातेगाँव, बोलठाण,भालूर सह आसपासच्या कुटुंबांना घरपोच शिरखुर्मा साठी आवश्यक वस्तू सुखामेवा सामानाचा किट ज्यात काजू, बदाम, पिस्ता, खोबरे सह एकूण 9 वस्तूंचा समावेश असून गरजवंत कुटुंबांना आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाऊंडेशनचे सभासद व स्थानिक कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाने घर घर जाऊन किटचे वाटप करण्यात आले.
या आनंदाच्या सणानिमित्त आमदार सुहास आण्णा साहेबांनी आपल्या सारख्या सामान्य जनतेचा विचार करून आपल्यासाठी, इतक्या महाग मोलाच्या वस्तू अगदी घरपोच पाठवल्याचे पाहून अनेकांची डोळे पाणावले सर्वांनी मनापासून सुहासआण्णा साहेबांना व रहेनुमा फाऊंडेशनच्या सदस्यांना दुआ देत आभारही मानले.


अजून बातम्या वाचा..

उर्जा संरक्षण वर राज्य स्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी नांदगावच्या जानवी भालेराव हीची निवड

उर्जा संरक्षण वर राज्य स्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी नांदगावच्या जानवी भालेराव हीची निवड

नांदगांव : मारुती जगधने ऊर्जा संवर्धनावर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा विद्युत मंत्रालय भारत सरकार...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिना निम्मित विनम्र अभिवादन

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिना निम्मित विनम्र अभिवादन

मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या...

read more
नांदगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने व काटेकोर पणे करावे – महेंद्र बोरसे

नांदगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने व काटेकोर पणे करावे – महेंद्र बोरसे

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्यातील शास्त्रीनगर आणि धोटाणे हे कालच्या नैसर्गिक आपत्तीचा...

read more
बघा व्हिडिओ – मनमाड रेल्वे स्टेशन जवळील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला पुणे इंदोर महामार्ग बंद

बघा व्हिडिओ – मनमाड रेल्वे स्टेशन जवळील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला पुणे इंदोर महामार्ग बंद

नांदगाव सोमनाथ घोगांणे मनमाड शहरांतून जाणाऱ्या इंदौर पुणे महामार्गावर असलेला रेल्वे ओव्हरब्रिज चा...

read more
.