Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आंतर महाविद्यालयीन केमियाड स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थिनींनी पटकावले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ….

Apr 24, 2023

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाडच्या रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींच्या संघाने मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन केमियाड स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सदर स्पर्धा ही रसायनशास्त्र या विषयाची असुन या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण 16 महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता, त्यात मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वाती काकड (तृतीय वर्ष विज्ञान), मृणाल संसारे (द्वितीय वर्ष विज्ञान) व शुभांगी पाटील (प्रथम वर्ष विज्ञान) यांच्या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले.विजयी संघाला ट्रॉफी, सर्टिफिकेट्स व रोख बक्षीसे देण्यात आले. या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. एल. शेंडगे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी एस देसले, अकॅडमीक कॉर्डिनेटर प्रा. रोहित शिंदे, कुलसचिव श्री समाधान केदारे व रसायनशास्त्राच्या सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले. जेएटी महाविद्यालय मालेगाव व येवला महाविद्यालय यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड च्या कार्यकर्त्यांचा ना भुजबळांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला...

read more

अन्यथा…आगामी काळात निर्बंध अधिक कठोर करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

  आज 3035 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती...

read more

वेटलिफ्टींग खेळाडू नूतन बाबासाहेब दराडे हीची मनमाड नगर परिषदेतर्फे स्वच्छता राजदूत म्हणून नियुक्ती

मनमाड शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची जनजागृती करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान २०२२ अंतर्गत...

read more
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये श्री शाकंभरी पौर्णिमा उत्सव संपन्न….

निस्पृह आणि विश्वासार्ह पत्रकारता करावी – ना.दादा भुसे. मनमाड नांदगाव शहरात पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी बनविण्याचा मानस – आ. सुहास कांदे

नांदगाव शहरात पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी बनविण्याचा मानस आहे असे सूतोवाच आमदार सुहास कांदे यांनी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]