loader image
[ays_poll id=7]

मालेगाव मध्ये लग्नासाठी वधू वराची हेलिकॉप्टर मधून एन्ट्री – सर्वत्र चर्चा या लग्नचीच

Apr 25, 2023

मालेगाव तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील नवदाम्पत्याच्या विवाहस्थळी दोघा वधू वरांची लग्नस्थळाजवळ
‘एन्ट्री’ ही थेट हेलिकॉप्टर मधून करण्यात आली.
हौसेला मोल नाही असे म्हटले जाते आणि याच वाक्याची प्रचिती देणारा सोहळा मालेगावमध्ये बघायला मिळाला.

आयुष्यातील एक महत्वाचा क्षण म्हणजे लग्न.लग्नाचा हा सोहळा अविस्मरणीय व्हावा म्हणून प्रत्येकजण काहीतरी खास प्रयत्न करतो.असाच एक वेगळा प्रयत्न नाशिकच्या मालेगाव मधील बारा बलुतेदार मित्र मंडळाचे बंडूकाका बच्छाव यांनी घडवून आणला.

लखमापूर येथील वर चि.लोकेश व चंदनपुरी येथील वधू पूर्वी या आदिवासी कुटुंबातील नवदाम्पत्याच्या लग्न सोहळ्यासाठी दोघा वधू वरांची लग्नस्थळाजवळ ‘एन्ट्री’ ही थेट हेलिकॉप्टर मधून करण्यात आली.

मालेगाव येथील आदिवासी कुटुंबातील वर आणि वधू हेलिकॉप्टरने दाखल झाल्याची ही घटना पहिल्यांदाच घडत असल्याने वधू -वरांना पाहणाऱ्यांची मोठी गर्दी केली होती.

मालेगाव शहरातल्या मसगा महाविद्यालयाच्या मैदानावरुन सजवलेल्या रथात निघालेल्या या आगळ्या वेगळ्या वर-वधुंची मिरवणुक पाहण्यासाठी बघ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बारा बलुतेदार मित्र मंडळाचे बंडू काका बच्छाव व वधू पिता कैलास पवार या दोघांची ३० वर्षांपूर्वीची मैत्री असल्याने वधुपिता यांनी बंडूकाका बच्छाव यांचेकडे तुमच्या मुलीचा जसा शाही विवाह सोहळा झाला तसाच आगळा वेगळा विवाह सोहळा माझ्या मुलीचा देखील व्हावा अशी इच्छा प्रकट केली होती

त्यानुसार मित्र बंडू काका बच्छाव यांनी मित्राला दिलेला शब्द पूर्ण करत लाखो रुपयांचा खर्च करत विवाह सोहळा पार पाडत मित्राची इच्छा पूर्ण केली..थेट वधू पूर्वी व वर लोकेश यांना हेलिकॉप्टर द्वारे लग्न मंडपात आणले

लग्नसोहळ्या प्रसंगी शेवटी वधूपित्याने भावनिक होत, मित्र असावा तर असा अशा शब्दात बंडूकाका बच्छाव यांचे आभार मानले.

सोबतच बाराबलुतेदार मित्र मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांनी विवाह सोहळ्यास केलेल्या सहकार्याबद्दल व सर्वोतपरी मदत केल्याची भावना ठेऊन आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.