loader image
[ays_poll id=7]

श्री पिनाकेश्वर महादेवाच्या सभामंडपाचे लोकार्पण सोहळा संपन्न

Apr 25, 2023


नांदगाव
नांदगाव तालुक्यातील जातेगांव पासून उत्तरेस सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगरावरील श्री पिनाकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरील सभामंडपाचे रविवार दि. 23 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता लोकार्पण सोहळा ह.भ.प. रामदास स्वामी महाराज यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेशगिरी महाराज हे होते.
या सभामंडपाचे बांधकाम हे पुर्ण जिर्ण झाल्याने देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण आणि सचिव रामदास पाटील कल्याण पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिव भक्तांना नवीन बांधकाम करण्यासाठी लोक वर्गणीचे आव्हान केले होते त्यास प्रतिसाद देत. सदाशिव होळकर, मगन परदेशी, आप्पा पवार, संदिप वाघचौरे, अनिल जाधव संभाजी नगर, रामदास खिरडकर नाशिक, राजेंद्र भालेराव, कृष्णाजी वाघ धोंदलगाव , ज्ञानेश्वर पगारे, निवृत्ती चव्हाण हे.मु.संभाजी नगर, शांताराम गायकवाड, रविंद्र चव्हाण, विपीन चव्हाण, रमेश गायकवाड कोकमठाण, रामदास चव्हाण, श्रावण भागवत, कल्याण पाटील चव्हाण, निंबाजी वाग पिंप्रीहवेली, सुंदरलाल चव्हाण, डॉ.प्रदिप चौधरी, भरत चव्हाण, संजय बंड, सौ.संजिवनी लामतुरे (बार्शी जी.सोलापूर), पोपट खैरनार, सुनील हिंगमिरे, रमेश गायकवाड, सुभाष पवार, मच्छिंद्र बागुल, प्रभु सिंह परदेशी, सुनील मगर (छत्रपती संभाजी नगर), गणेश व्यवहारे, राजेंद्र पवार, रशिद शाहा, नंदु सिंग परदेशी, महादु काळे यांनी लोकवर्गणी दिली होती. त्यातून सभामंडपाचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. त्या दानशूर व्यक्तींचे व आर्किटेक्ट तांबट, बांधकाम व्यावसायिक राजेंद्र नरवडे, तसेच लोकार्पण सोहळ्यासाठी मंडपचे सौजन्य दिलेल्या धोंडिराम पवार आणि सहकार्यांचे रामदास स्वामी यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व शाॅल देवून गौरविण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना रामदास स्वामी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सन १९६० च्या दशकात संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी पुरातन जिर्णोद्धार करून हेमाडपंथी पद्धतीचे मंदिरांचे बांधकाम करुन जिर्णोद्धार केला होता. व त्यानंतर संत जनार्दन स्वामी हे वेरुळ येथे गेल्यानंतर बाल ब्रम्हचारी सगगुरु गंगानंद महाराज यांनी ५० वर्षांपूर्वी अपुर्ण सभामंडप बांधकाम पुर्ण केले होते. त्यावेळी येथे येण्यासाठी रस्ता नव्हता बांधकामाचे अशा परिस्थितीत संत जनार्दन स्वामी आणि गंगानंद महाराज यांनी पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहकार्याने मंदिराचे व सभामंडपाचे, तसेच भक्त निवास, भंडारगृह, गोशाला इत्यादी बांधकाम पुर्ण केले होते, त्यावेळी देखिल मी ब्रम्हचारी सगगुरु गंगानंद महाराज यांच्या सोबत होतो. व आज त्या जिर्ण झालेल्या सभामंडपाचे लोकार्पण माझ्या हस्ते करतांना मला मनापासून आनंद होतो आहे असेच जातेगांव आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी एकत्र येऊन येथे येणार्या भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी तसेच इतर अनेक कामे करण्यासारखे आहे ते करावे असे म्हणाले.
यावेळी साध्वी मणिषाताई, डॉ.शरद आहेर, वाल्मिक जठार, रविंद्र चव्हाण, यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नारायण पवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता
महाप्रसादाचे वितरण करुन करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.