मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठला असुन महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मनमाडकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ येणार आहे. मनमाडला सध्या १५ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो मात्र जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात २० ते २५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर येऊ शकते. शहरातील वागदर्डी व पाटोदा साठवणूक तलावात महिनाभर पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. पालखेड धरणाच्या आवर्तनावर परिस्थिती अवलंबून राहणार आहे.
रमजान ईद चा सण उत्साहात साजरा
मनमाड - प्रेम, सद्भावना, शांती आणि एकतेचा संदेश देणारा रमजान ईदचा सण गुरुवारी मनमाड शहरात साजरा...











