loader image

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन – ना. भारती पवार राहणार उपस्थित

May 1, 2023


ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड कारखाना शाखेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ५/५/२३ रोजी बुध्द पौर्णिमेच्या मंगलप्रसंगी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनचे केंद्रीय अध्यक्ष आयु.बी.एल.बैरवा उपस्थित राहणार आहे असून नांदगाव विधानसभाचे आमदार सुहास कांदे,अपर मंडळ रेल्वे प्रबंधक भुसावळ आयु.नवीन पाटील, मुख्य कारखाना प्रबंधक मयंक सिंग,गणेश धात्रक माजी नगराध्यक्ष,राजाभाऊ आहिरे उपनागराध्यक्ष,राजाभाऊ पगारे मा.नगराध्यक्ष, सहायक मंडळ अभियंता विशाल भाकुणी, सहायक मंडळ चिकित्साधिकारी, मनमाड डॉ.मनिष क्षत्रिय, सहायक सुरक्षा आयुक्त जयप्रकाश मौर्या, तहसीलदार (नांदगाव) सिद्धार्थ मोरे, नितीन पांडे(झोनल रेल्वे सल्लागार समिती), जयकुमार फुलवाणी(मंडळ रेल्वे सल्लागार समिती), राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव,मंगलेश बाकलीवाल ,झोनल सचिव सतिश भाऊ केदारे आदी उपस्थित राहणार आहे.
तसेच ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे मुंबई, सोलापूर, पुणे, भुसावळ, नागपूर मंडळ व भायखळा,परेल,मांटुगा, नाशिक रोड, भुसावळ पी.ओ.एच.कुर्डुवाडी, आदी अतिरिक्त मंडळचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
सदर उद्धघाटन समारंभचा कार्यक्रम रेल्वे दवाखाण्या समोर शुक्रवार दिनांक ५/५/२३रोजी सायं.६:००वा. संपन्न होणार आहे
अशी माहिती झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय गेडाम, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, उपाध्यक्ष सागर गरूड, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष विनोद झोडपे, खजिनदार संदिप धिवर यांनी दिली.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.