loader image

गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू ठेवावी; आर पी आय ची मागणी अन्यथा रेल रोकोचा इशारा

May 5, 2023


मनमाड मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस गेल्या अनेक वर्षापासून सुरु असून या प्रवासी गाडीला मनमाड सह मालेगाव- येवला- चांदवड- नांदगाव येथील प्रवासी मोठ्या संख्येने या गाडीतून मुंबई व मनमाड असा प्रवास करत असतात तसेच लासलगाव- निफाड-नाशिक येथील मोठ्या संख्येने प्रवाशांची जीवन संजीवनी असणारी ही प्रवासी गाडी आहे. प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असलेली ही गाडी आता रेल्वे प्रशासनाकडून धुळे येथून सोडण्याचा अट्टाहास सुरु असल्याचे समजते सदर गाडी धुळे येथून सुटल्यास हा निर्णय प्रवाशांच्या हिताचा ठरणार नाही आधीच या गाड़ीत मनमाडहून प्रचंड गर्दी असते. त्यात पुन्हा धुळे येथून ही सुटल्यास मनमाड-लासलगाव- निफाड- नाशिक या ठिकाणच्या हजारो नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तर जागाच रहाणार नाही हा निर्णय नाशिक जिल्ह्यावर अन्यायकारक ठरणारा आहे.

मनमाड मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसला प्रवाशांसह, विद्यार्थी, नोकरवर्ग, व्यापारी, शेतकरी यांचा मोठा प्रतिसाद असताना सदर गाडी का धुळे येथून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेत आहे हा निर्णय त्वरीत रेल्वे प्रशासनाने मागे घ्यावा व मनमाड येथून सदर गाड़ी कायमस्वरुपी सुरु रहावी अशी आमची मागणी आहे. सदर गाड़ी धुळे येथून सुटल्यास रिपाई (आठवले) गट लोकहित लक्षात घेता सदर निर्णयाविरुध्द कुठल्याही क्षणी जनआंदोलन हाती घेईल व रेल रोको कुठल्याही क्षणी करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी.असे निवेदन रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना देण्यात आले यावेळी राजाभाऊ आहिरे, गंगादादा त्रिभुवन,कैलास अहिरे,सुशिल खरे,अकील शेख
पापा शहा ,पी. आर. निळे, हरीभजन चावरीया,बाळासाहेब मोरे ,गुरुकुमार निकाळे ,प्रमोद अहिरे ,आप्पाजी भालेराव,विलास अहिरे ,दिलीप नरवडे,दिनकर कांबळे, सुरेश जगताप आदींच्या सह्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.