loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष साजरा

May 6, 2023


केआरटी शाळेत लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सादर करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर हे होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी,मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते. सौ संगीता सनस यांनी शाहू महाराजांविषयी आपले विचार मांडले.संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत दीन शोषितांचे तारणहार थोर समाज सुधारक लोकराजा शाहू महाराज हे एक थोर भारतीय समाज सुधारक व कोल्हापूर संस्थांचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घराण्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे हे होते. शाहू राजांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव (अप्पासाहेब) हे होते. कोल्हापूर संस्थान चे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या चौथ्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतराव ला दत्तक घेतले त्यांचे ‘शाहू ‘असे नामकरण केले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी मिसर सर यांनीआपले विचार मांडले. शाहू महाराज हे लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे लोकप्रिय होते. सन 1889 ते 1893 या काळात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले 1 एप्रिल 1891 रोजी शाहू महाराज लक्ष्मीबाईशी विवाहबद्ध झाले.
इसवी सन 1894साली शाहू महाराज यांनी संस्थानाच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. कार्याचा उद्देश समाज परिवर्तन घडवणे हा होता. त्यांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी सोनतळी येथे भटक्या विमुक्तांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली. शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत शिक्षण. आरोग्य. कृषी.उद्योग कला क्रीडा इत्यादी सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान दिले. आपण सर्व शाहू महाराजांना लोक कल्याणकारी राजा म्हणून ही ओळखतो दुर्दैवाने 6 मे 1922 रोजी मुंबई येथे शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला.
कार्यक्रमाला शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संगीता कदम देसले यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म...

read more
नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

मनमाड - मार्च महिन्यातच जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे....

read more
ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

मनमाड - सालाबादप्रमाणे  1986 पासून सलग 38 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...

read more
.