loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन

May 7, 2023


मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दी वर्ष सोहळा उत्साहात संपन्न झाला. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण केल्यानंतर आपल्या मनोगतातून डॉ. अरूण पाटील यांनी लोककल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा नष्ट होणार नाही याची जाणीव राजर्षी शाहू महाराजांना होती. म्हणून त्यांनी शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला व आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केल्या. जागोजागी वस्तीगृह स्थापन केले. भटक्या विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. राजर्षी शाहू महाराज हे थोर समाज सुधारक होते. शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्य निवारण. इत्यादी सुधारणाचे पुरस्कर्ते होते. या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जी. एल. शेंडगे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. ज्योती पालवे, किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य श्री पी.के. बच्छाव, वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. व्ही अहिरे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.