loader image
[ays_poll id=7]

नाशिकचे मनीष सोनीमिडे यांचे नुकतेच निधन झाले…..त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वाबाबत सी ए प्रफुल्ल बरडीया यांनी व्यक्त केलेल्या भावना

May 12, 2023


नाशिक चे मशनरी उद्योजक यश एंटर प्राइज चे संचालक दानशूर व दिलखुलास व्यक्तिमत्त्व मनिष सोनीमिडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले .. या दिलखुलास व्यक्तिमत्वाबाबत सी.ए. प्रफुल्ल बरडीया यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांचेच शब्दात….विजय चोपडा नांदगाव

एक तारा निखळला….

 मनिष…

एक मनमोकळ व्यक्तिमत्त्व, एक दिलखुलास व्यक्तिमत्व, एक हसतं खेळतं व्यक्तिमत्व…

अचानक असा, सहन करायला अवघड जाईल असा धक्का देत .. इहलोकाची यात्रा आनंदात संपवून परलोकाची यात्रेस निघाला…

परंतु मागे ठेवून गेला… ते नाव… मनिष… ते हसतमुख चेहऱ्यावरील स्मित हास्याची आठवण…

 *Exactly* हा त्याचा शब्द प्रकर्षाने त्याची आठवण करून देईल…

आर्थिक सुबत्ता गाठता-गाठता अनेक माणसे आपल्या मधाळ वाणीने जोडली… आपल्या व्यवसायात *सचोटी आणि शुद्ध व्यवहार* करतं माणसं जोडली, संबंध जोडले, जोपासले आणि आपलं नाव मागे ठेवून निरोप घेतला…

न बोलता, न वाच्यता करता, आपल्या स्मित स्वभावाने आम्हा मित्रांना सोबत जोडून ठेवण्यास एक मोठी भूमिका अदा केली…

मधुभाभी, यश आणि राजवर नितांत प्रेम करत एक आदर्श परिवार कसा उभा करावा… याचं छान असं उदाहरण मागे ठेवून गेला…

मनिष, तुझं व्यवहार कौशल्य अप्रतिम होतं…

दुबईत आपलं एक निवासस्थान असावं असं स्वप्न पाहणं तसं दुर्मिळ…

तू ते स्वप्न पाहिलं…. आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्यरत राहिलास… 

आम्हा मित्रपरिवाराचा एक मोठा मानसिक आधारस्तंभ आज कायमचा गेला…

मनिष – गोल्डन मित्रपरिवार


अजून बातम्या वाचा..

आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आ.सुहास अण्णा कांदे यांच्यावतीने मनमाड शहर शिवसेनेतर्फे बौद्ध विधी उपासक (बौद्धाचार्य) यांचा सपत्नीक सत्कार व सन्मान

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मनमाड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 7...

read more
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध : डॉ. भारती पवार

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, दिव्यांग सशक्तिकरण विभागाअंतर्गत जिल्हा...

read more
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा – १८ फेब्रुवारीला मनमाड मध्ये भरगच्च कार्यक्रम

मनमाड - अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

read more
.