loader image

सरकार विरोधी वक्तव्य भोवले ; खासदार संजय राऊत यांच्यावर नाशकात गुन्हा दाखल

May 14, 2023


आपल्या भाषणातून विरोधकांवर सातत्याने खरमरीत टीका करणारे खासदार संजय राऊत यांच्यावर नाशकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य सरकारविरोधात केलेले एक वक्तव्य खासदार संजय राऊतांना चांगलच महागात पडले आहे. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशकात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेने या सरकारच्या नियमांचे पालन करु नये, असं वक्तव्य त्यांनी केले होते. काही दिवसांपूर्वी सत्ता संघर्षावर सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. यावर सर्वच नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत आहेत. तसेच शिंदे ठाकरे असे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. संजय राऊतांनी सरकारविरोधी वक्तव्य केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.


अजून बातम्या वाचा..

.