loader image

मासिक वेतन अदा करण्यापोटी १० हजार लाचेची मागणी – महिला अधिकाऱ्यासह तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

May 18, 2023


जिल्हा हिवताप विभागातील आरोग्य सेवकाचे मासिक वेतन अदा करण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्यांसह दोघांना ए सी बी च्या अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या. वैशाली दगडू पाटील , वय- 49 वर्ष, व्यवसाय-जिल्हा हिवताप अधिकारी , नाशिक, वर्ग 02,रा.स्टेटस रेसिडेन्सी गंगापूर,नाशिक,संजय रामू राव, वय-46 वर्ष, व्यवसाय- आरोग्य सेवक, जिल्हा हिवताप विभाग, नाशिक,वर्ग 03,रा. पाथर्डी फाटा, नाशिक, कैलास गंगाधर शिंदे, वय-47 वर्ष, आरोग्य सेवक, जिल्हा हिवताप विभाग, नाशिक,वर्ग 03,रा. पांडव नगरी, नाशिक यांनी आरोग्य सेवक असलेले तक्रारदार आजार पणामुळे रजेवर होते तदनंतर सेवेत हजर होऊनही जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती पाटील यांनी त्यांचे वेतन अदा केले नाही. सदर वेतन अदा करण्यासाठी 10,000/-₹ लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारन्यास प्रोत्साहन दिले. संजय रामू राव, आरोग्य सेवक, हिवताप नाशिक यांनी दि.15/05/2023 रोजी 10,000/-₹ लाचेची मागणी करून दि.17/05/2023 रोजी कैलास गंगाधर शिंदे, यांना स्वीकारण्यास सांगितले असता शिंदे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी
आलोसे क्र 01) यांचे सक्षम मा. आयुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्तालंय मुंबई
आलोसे क्र 2) व 3) यांचे सक्षम मा. सह संचालक हिवताप, नाशिक
सापळा अधिकारी
श्रीमती साधना इंगळे , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

सापळा पथक पो. हवा.सचिन गोसावी.
पो. हवा. प्रफुल्ल माळी.
पो. हवा. प्रकाश डोंगरे
मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक

श्री.नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक.

मा.श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.
—————————
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
टोल फ्री क्रमांक १०६४ .


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.