Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पतसंस्थेला दिलेला धनादेश वटला नाही – कर्जदारास दोन महिने कारावास

May 22, 2023

पंधरा हजार रुपायांचा चेक बाऊंस झाल्याप्रकरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदार कल्पना भाऊसाहेब नेमनार यांना न्यायालयाने दोन महिने कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या पतसंस्थेतून दहेगाव (ता. चांदवड) येथील कल्पना नेमनार यांनी वैयक्तिक कारणासाठी १५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात कर्जदार यांनी पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठी ५० हजार रुपयाचा धनादेश दिला होता. मात्र, दिलेला धनादेश पास न होता बाऊंस झाला. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात उभय बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मनमाडच्या न्यायदंडाधिकारी एस. ए. लोमटे यांनी कर्जदारास दोन महिने कारावास व एक लाख रुपये नुकसानभरपाईची शिक्षा ठोठावली. पतसंस्थेतर्फे अॅड. महेश प्रभाकर पाटील यांनी कामकाज पाहिले. पतसंस्थेचे व्यवस्थापक रामदास दत्तू दुभासे यांनी सहकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरात कुठे ही गाय,बैल आजारी वा जखमी अवस्थेत दिसल्यास संपर्क करण्याचे आवाहन

मनमाड शहरात कुठे ही गाय,बैल आजारी वा जखमी अवस्थेत दिसल्यास संपर्क करण्याचे आवाहन

मनमाड शहरात विविध परिसरात गोवंश जखमी अवस्थेत अथवा आजारी निदर्शनास आल्यास कृपया खालील भ्रमण ध्वनी...

read more
मालेगाव येथून सांयकाळी ७ वाजेनंतर बस सुरू करावी: व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

मालेगाव येथून सांयकाळी ७ वाजेनंतर बस सुरू करावी: व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

नांदगाव सोमनाथ घोंगाणे मालेगाव येथून नांदगाव येथे येण्यासाठी सांयकाळी ७ वाजेनंतर एकही बस नसल्याने...

read more
🛑 फलक रेखाटन

🛑 फलक रेखाटन

देशसेवा व्रत हाती स्वीकारून ,देश,गाव, गावातील घर, गावातील शाळा,गावातील शेती,माती,व मातीत राबणाऱ्या...

read more
नांदगाव शहरातील मुस्लीम बहूल गुलझारवाडी येथे महिलांसाठी कोचींग क्लासेस  प्रशिक्षण संपन्न

नांदगाव शहरातील मुस्लीम बहूल गुलझारवाडी येथे महिलांसाठी कोचींग क्लासेस प्रशिक्षण संपन्न

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील माजी नगरसेवक दिवंगत इकबाल दादा शेख कोचिंग क्लासेस मार्फत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]