loader image

नांदगाव तालुक्यातील जनतेसाठी आ. सुहास कांदे यांच्यामार्फत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

May 25, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्यातील जनते साठी आ. सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून मोतीबिंदू ऑपरेशन सेवा आजपासून सुरू
आज डोळ्यांच्या ऑपरेशन साठी ४५ जेष्ठ नागरिकांची पहिली बॅच आज नाशिक साठी रवाना झाली. या प्रसंगीमाजी नगराध्यक्ष राजेश ( बबीकाका ) कवडे यांनी श्रीफळ वाढवून सर्व रुग्णांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आ. कांदे यांच्या स्वखर्चातून सुरू असलेली आरोग्य सेवा अंतर्गत मोफत डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन करून देण्यात येत आहेत. मोफत फिरता दवाखाना अंतर्गत गावागावात कॅम्प लावले जात असून या प्रसंगी मोफत डोळ्यांची तपासणी व मोफत चष्मे दिले जात आहे, या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशन सांगितले असतील त्या रुग्णांना मोफत ऑपरेशन, प्रवास, चहा, नाश्ता, जेवण दिले जात आहे. नाशिक येथील प्रसिद्ध डॉ. प्राची पवार यांचे मणिशंकर आय हॉस्पिटल येथे ऑपरेशन केले जाणार आहे.
आज आमोदे, बोराळे, मांडवड, परिसरातील ४५ पेशंट आज ऑपरेशन साठी नाशिक येथे रवाना झाले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर सर्वांना सुखरूप आप आपल्या गावी सोडविण्यात येणार आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.