Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रकाशन

May 27, 2023

नांदगावचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम लिखित आणि ग्रंथाली प्रकाशन निर्मित ‘नांदगाव ते लंडन प्रवास वर्णन व उजेड पेरायचा आहे काव्यसंग्रह या दोन पुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या मु.श.औरंगाबादकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, मविप्र समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, माजी मंत्री बबन घोलप, साहित्यिक लीला शिंदे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, माजी आमदार पंकज भुजबळ, नानासाहेब बोरस्ते, अॅड. अनिल आहेर, बापूसाहेब कवडे, जगन्नाथ धात्रक, ग्रंथालीचे सुदेश इंगलासपूरकर, शंकर बो-हाडे व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराजा सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन कदम कुटुंब वाटचाल करीत आहेत. ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, माजी मंत्री बबन घोलप, सुदेश इंगलासपुरकर, अॅड. नितीन ठाकरे, अॅड. अनिल आहेर, बापूसाहेब कवडे, क्षितिजा कदम यांनीही मनोगतातून शुभेच्छा दिल्या.
गौतम संचेती यांनी प्रास्ताविक केले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी संगीता कदम, विशाखा कदम, संदीप देशपांडे, रमेश कदम, वसंतराव खैरनार, यांसह नांदगाव मनमाड तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

अजून बातम्या वाचा..

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव शहर व परिसरातील महिलांसाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीची सुविधा...

read more
दारू-गुटख्यापलीकडचे नवे व्यसनजाळे; कॉलेज तरुणाईसमोर ‘लपलेल्या’ व्यसनांचे आव्हान प्रभावी जनजागृती आवश्यक

दारू-गुटख्यापलीकडचे नवे व्यसनजाळे; कॉलेज तरुणाईसमोर ‘लपलेल्या’ व्यसनांचे आव्हान प्रभावी जनजागृती आवश्यक

तरुणांमधील व्यसन म्हटले की दारू, सिगारेट, गुटखा किंवा तंबाखू एवढ्यापुरतीच चर्चा केली जाते. मात्र...

read more
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अधिसूचित संस्थांना दिली जाणारी कर सवलत होणार रद्द? ७ तारखेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

भारतात सोने-चांदीची मागणी नेहमीच मजबूत असते. मात्र, या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात परदेशातून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]