loader image

नांदगाव रेल्वे स्थानकावर २९ आणि ३० मे रोजी २४ तासांचा मेगा ब्लॉक – अनेक गाड्या रद्द

May 28, 2023


नांदगांव येथे दि.29/05/2023 दुपारी 03:30 pm ते 30/05/2023 03:30 pm.पर्यंत जळगांव-मनमाड दरम्यान 3र्‍या लाइनसाठी यार्ड रीमॉडेलिंगच्या प्री-NI आणि नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे 24 तासांचा ब्लॉक घेतला जाणार असुन त्या दिवशी पुढील गाड्या रद्द//मार्गात बदल//नियंत्रित गाड्या करण्यात येत आहे.

● रद्द गाड्या 👇
1) 11114 भुसावळ देवळाली मेमु दि.29 मे रोजी रद्द राहिल.

2) 11113 देवळाली भुसावळ मेमु दि.30 मे रोजी रद्द राहिल.

3) 11026 डाऊन,पुणे – भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस,(जी सध्या पुणे ऐवजी ईगतपुरी हुन धावत आहे,ती) दि.29 मे रोजी रद्द राहिल.

4) 11025 अप,भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेस,(जी सध्या पुणे ऐवजी ईगतपुरी पर्यंत धावत आहे,ती) दि.30 मे रोजी रद्द राहिल.

5) 12140 अप,नागपुर – मुंबई सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.29 मे रोजी रद्द राहिल.

6) 12139 डाऊन,मुंबई – नागपुर सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.30 मे रोजी रद्द राहिल.

7) 11119/11120 भुसावळ – ईगतपुरी – भुसावळ मेमु दि.30 मे रोजी रद्द राहिल.

● गाड्यांच्या मार्गात बदल 👇

1) 12753 डाऊन,नांदेड — हजरत निजामुद्दीन मराठवाडा संपर्कक्रांती सुपरफास्ट एक्सप्रेस, दि.30 मे रोजी नगर,मनमाड,जळगांव,भुसावळ स्टेशन ऐवजी अकोला,मलकापुर,भुसावळ बायपास लाईन मार्गे धावेल.

2) 12716 अप,अमृतसर — नांदेड सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.29 मे रोजी भुसावळ स्टेशन,जळगांव,40 गांव,मनमाड ऐवजी भुसावळ बायपास लाईन,मलकापुर,अकोला मार्गे धावेल.

3) 12715 डाऊन,नांदेड — अमृतसर सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.30 मे रोजी जालना,संभाजीनगर,मनमाड,जळगांव,भुसावळ स्टेशन ऐवजी अकोला,मलकापुर,भुसावळ बायपास लाईन मार्गे धावेल.

4) 12617 डाऊन,एर्नाकुलम — हजरत निजाममुद्दीन मंगला लक्षद्वीप सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.28 मे रोजी ईगतपुरी,नाशिक रोड,मनमाड ऐवजी रोहा,बोईसर,उधना,जळगांव,भुसावळ मार्गे धावेल.

5) 12618 अप,हजरत निजाममुद्दीन — एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.29 मे रोजी मनमाड,नाशिक रोड,ईगतपुरी ऐवजी भुसावळ,जळगांव,ऊधना,बोईसर,रोहा मार्गे धावेल.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.