Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ओनस्वी तुझ्या जिद्दीला सलाम

May 28, 2023

मनमाड – १२ वीच्या महत्वपूर्ण वर्षातच घरावर कोसळलेल्या संकटाचा धीरोदत्तपणे सामना करत आणि घरची जबाबदारी समर्थपणे सांभाळत ओनस्वी राजेंद्र ताथेड हिने जिद्द आणि चिकाटीद्वारे विज्ञान शाखेतून मिळवलेले यश अनमोल असेच मानावे लागेल.

मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ताथेड यांची ओनस्वी ही कन्या. नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वीच्या निकालात ओनस्वीला विज्ञान शाखेतून ६८.८३ टक्के यश गुण मिळाले. हे गुण दिसायला थोडेसे कमी वाटत असले तरी ज्या खडतर परिस्थितीतून तीने हे यश मिळवले ते पहाता या गुणांचे मोल कितीतरी अधिक ठरते ओनस्वी १२ वी ला गेली तोपर्यंत सारे काही आलबेल सुरू होते. मात्र २ एप्रिल २०२२ रोजी आनेस्वीच्या कुटुंबावर संकटाचा डोंगरच कोसळला. ओनस्वीची आई सौ. अरूणा ताथेड यांचे दोन्ही पाय
अचानक पॅरेलीस झाले. त्यांना तातडीने नासिकला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र दोन्ही पाय कायमचे काढून टाकावे लागतील असे सांगण्यात आले. त्यांचा जीव वाचावा म्हणून राजेंद्र ताथेड यांनी या निर्णयाला संमती दिली. अवघ्या एका दिवसात ओनस्वीचे लाड करणारी काळजी घेणाऱ्या आईने अंथरूण धरले. महिनाभर हॉस्पीटलमध्ये ठेवून त्यांना नंतर घरी पाठविण्यात आले.

या परिस्थितीत घरातील जबाबदाऱ्या ओनस्वीवर येवून पडल्या. एका बाजूला आईची सेवा, येणा- जाणाऱ्या पाहुण्यांकडे लक्ष देणे. एक वेळचा स्वयंपाक, लहान भावाची काळजी, त्याचा अभ्यास आणि वडीलांनाही आधार देण्याचे काम तीने समर्थपणे केले. एवढे सर्व करून कॉलेज, क्लास नियमीतपणे सुरूच होते. अशा चहुबाजूंनी कोसळलेल्या संकटांमुळे एखाद्याने हार मानली असती. मात्र आनेस्वीने प्रचंड जिद्दीने आणि चिकाटीने या परिस्थितीशी मुकबाला केला. सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळतांना आणि चिकाटीने अभ्यास करून विज्ञान शाखेतून ६८.८३% गुण मिळवले आहेत. आयुष्याची पहिली लढाई तिने जिंकलेली आहे. ओनस्वी हिने सिध्दी क्लासेसमध्ये क्लास लावलेला होता.

“ओनस्वीच्या या साऱ्या संघर्षाचे आम्ही साक्षीदार आहोत. ज्या परिस्थितीत तीने हे यश मिळविले ते बहुमोल आहे. ओनस्वी तुझ्या जिद्दीला सलाम” अशी गहिवरलेली प्रतिक्रिया सिध्दी क्लासेसच्या संचालिका सौ. भाग्यश्री दराडे यांनी निकालानंतर व्यक्त केली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने  अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले‌

मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]