मनमाड : रेल्वेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांनी दानापूर – पुणे एक्सप्रेसमध्ये मदरशाच्या शिक्षणासाठी घेऊन जाणाऱ्या ५९ मुलांना ताब्यात घेतले आहे तर त्यांची तस्करी करणारे पाच जन ताब्यात घेतले आहे. ५९ पैकी ३० मुले मनमाड रेल्वे स्थानकात ताब्यात घेण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

गुप्त माहिती मिळाल्याच्या आधाराने रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी गाडी क्रमांक ०१०४० दानापूर – पुणे एक्सप्रेस मध्ये मदरशाच्या नावाखाली बिहार राज्यातून तस्करी करून आणलेली मुले सांगलीत घेऊन जात आहे. ही माहिती हाती आल्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानकात गाडी आल्यानंतर तिची कसून तपासणी केली असता त्यात बालके आढळून आली. वेगवेगळ्या डब्यात असलेली अधिकाऱ्यांनी २९ मुले त्याब्यात घेतली तर त्यांची तस्करी करणारा एक तस्कर व्यक्ती ताब्यात घेतला आहे. त्यानंतर संशय आल्यावर पुन्हा गाडीची तपासणी करण्याचे आदेश आल्यावर सदर गाडीची तपासणी करत अधिकारी कर्मचाऱ्यांना या धावत्या गाडीत पुन्हा वेगवेगळ्या डब्यात मुले आढळून आली. ३० मुले त्यांनी मनमाड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतली. तर या मुलांना घेऊन जाणारे पाच तस्कर यांना ताब्यात घेतले आहे. ८ ते १५ वयोगटातील ३० मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. चौकशीत मदरशाच्या नावाखाली बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातून सदर मुले सांगलीत घेऊन जाणार होते. मनमाड मध्ये पकडलेल्या चार तस्कर यांच्यावर मानवी तस्कर अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या ३० मुलांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना नाशिकच्या बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. तर भुसावळ येथील २९ मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत जळगावला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. मनमाड येथील चार तस्करांना न्यायालयात हजर केल्यावर १२ दिवसांची कोठडी दिली आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्कप्रमुख डॉ. शिवराज मानसपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.








