loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात “वटपौर्णिमा” सुहासनिंकडून उत्साहात साजरी….

Jun 3, 2023


मनमाड : भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचं वेगळं महत्व आहे. वट पौर्णिमा या सणाचं अध्यात्मिक आणि धार्मिक महत्व खूप वेगळं आहे. आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा या भावनेने भारतीय महिला उपवास करतात. सोबतच वडाच्या झाडाची पूजाही करतात.

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. अनेक ठिकाणी हे व्रत जेष्ठ अमावस्येच्या दिवसापासून ते जेष्ठ पौर्णिमेच्या तिथीपर्यंत केले जाते. वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

मनमाड शहरामध्ये सुवासनिंकडुन वटपौर्णिमा भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.स्रियांनी आपल्या पतीसाठी उपवास करून वडाच्या झाडाची पुजा केली. यावेळी अनेक ठिकाणी वडाच्या झाडाची पुजा करण्यासाठी महिलांची गर्दी पाहण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

दृष्टीक्षेप संदीप देशपांडे  विश्वचषक स्पर्धा 2023  न्यूझीलंडचा विजयी सूर .. पाकिस्तान सेमी पासून दूर…..

दृष्टीक्षेप संदीप देशपांडे विश्वचषक स्पर्धा 2023 न्यूझीलंडचा विजयी सूर .. पाकिस्तान सेमी पासून दूर…..

अखेर बंगलोर चा निसर्ग न्यूझीलंडवर मेहेरबान झाला. ज्या बंगलोर च्या पावसाने 400 रन्स काढूनही...

read more
सत्ताधारी राष्ट्रवादी गटाचे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी साठी उपोषनाचा दुसरा दिवस

सत्ताधारी राष्ट्रवादी गटाचे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी साठी उपोषनाचा दुसरा दिवस

नांदगाव : (मारुती जगधने)नांदगांव येथील राष्ट्रवादी(एस पी) गटाचे उपोषन मागे घेण्यात आले त्याच दिवसी...

read more
.